`एमपीएससी`ची पाच एप्रिलची परीक्षा पुढे ढकला` - postponed March 5 mpsc examination demands student | Politics Marathi News - Sarkarnama

`एमपीएससी`ची पाच एप्रिलची परीक्षा पुढे ढकला`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 मार्च 2020

पुणे : कोरोनोचे संकट लक्षात घेऊन ओरिसा राज्य लोकसेवा आयोगाने या महिन्यातील सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. तसे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. सगळया परीक्षा रद्द केल्याने तिथल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षेबाबत ठाम भूमिका घेतलेली नाही.

पुणे : कोरोनोचे संकट लक्षात घेऊन ओरिसा राज्य लोकसेवा आयोगाने या महिन्यातील सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. तसे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. सगळया परीक्षा रद्द केल्याने तिथल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षेबाबत ठाम भूमिका घेतलेली नाही.

31 मार्च पर्यंत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तर 5 एप्रिलला असणारी परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेची तयारी आयोगाने केली आहे. आयोगाच्या या भूमिकेमुळे उमेदवार संभ्रमात आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी असलेले उमेदवार कोरोनाच्या भीतीने गावाकडे गेले आहेत, काही आयोगाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.

कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सीबीएसईनंतर आता आयसीएसई  आणि आयएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. 19 मार्च ते 31 मार्च दरम्यान होणारे सर्व पेपर नंतर घेण्याचे ठरले आहे

ओरिसा सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आयोगाच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 31 मार्च पर्यंत जर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तर मात्र पाच एप्रिलला असणारे पेपर घेण्याची सर्व तयारी केली आहे. त्यामुळे परीक्षा होऊ शकतात असाही एक संदेश उमेदवारांकडे गेला आहे.

पुण्यात अभ्यास करणारे शेकडो उमेदवार कोरोनाच्या भीतीमुळे  गावी गेले आहेत. काही थांबून राहिले आहेत .अभ्यासात अनियमितपणा आलेला आहे, परीक्षा रद्द होईल की होईल याबाबत ठाम कोणीही सांगू शकत नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत. उमेदवारांना आईवडील "परीक्षा राहू दे पहिलं घरी या ."अशी साद घालत आहेत. मात्र आयोगाने पाच एप्रिलच्या पेपरबाबत डळमळीत भूमिका घेतल्याने अनेक उमेदवार पुण्यात थांबले आहेत.

पुण्यात पाचपेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी जमण्यास बंदी आहे. पुणे शह,र जिल्ह्यातील  सर्व दुकाने ,हॉटेल्स , पानटपरी , शाळा ,महाविद्यालये ,क्लासेस ,क्लब ,थिएटर ,उद्यान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहेत. पाच एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित परीक्षेला ४० हजार उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. एका परीक्षा केंद्रावर किमान ४०० पेक्षा जास्त उमेदवार असणार आहे. दुसरीकडे जमावबंदीचा आदेश आहे.  परीक्षेपेक्षा युवकांचा जीव महत्वाचा आहे. कारण आता पालक आपल्या मुलाला/ मुलीला पुण्यासारख्या ठिकाणी परीक्षेला पाठविनार नाही. त्यामुळे अशा भीतीदायक वातावरणात परीक्षा देण्याची मानसिकता राहिली नाही. त्यामुळे राज्य सरकारने व आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. आम्ही समजू शकतो की, परीक्षेबाबत सर्व तयारी झाली आहे. त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत हे देखील जाणून आहे. पण जर देशात विविध विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येथे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे आयोगाने देखील याबाबत विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंटस राईट या संघटनेच्या सदस्यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख