POSITIVE News: Corona three patient are ok in Nagar city | Sarkarnama

POSITVE न्यूज : नगरमध्ये त्या तिघांची तब्बेत ठणठणीत 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

नगरमध्ये फवारणी सुरू 
नगर शहरात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तो ज्या भागातील रहिवासी आहे, त्या भागात तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात येऊन कोणाला सर्दी, खोकला असा त्रास आहे, का याची चाचपणी करण्यात येत आहे.

नगर : कोरोनाच्या भितीने गाळ उडालेल्या नगरकरांना कोरोनाबाबत "पॉझिटिव्ह" न्यूज यापूर्वीचे बाधित असलेले तीनही रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 346 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 25 जणांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले. पुणे येथील प्रयोगशाळेकडे 236 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 211 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरीच होम कॉरंटाईनवर ठेवले आहे. 

त्याचबरोबर यापूर्वी कोरोनाबाधीत असलेल्या तीनही रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी आज आढावा घेवून आवश्‍यकत्या सूचना दिल्या. रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्यांपैकी 79 जणांवर आतापर्यंत डॉक्‍टरांचा वॉच आहे. 

पहिल्या रुग्णाला चैदा दिवस पूर्ण 
दरम्यान, यापूर्वी आढळलेल्या कोरोना बाधित पहिल्या रुग्णास बुधवारी चौदा दिवस पूर्ण होणार आहेत. त्याचा अहवाल गुरुवारी पुन्हा पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्याच्या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे. त्याची प्रकृती सध्या ठणठणीत असल्याने त्याचा अहवालही निगेटिव्ह येईल, अशीच शक्‍यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास नगरकरांना मोठा दिलासा मिळेल. 

ही प्रक्रिया पुढील चौदा दिवस सुरूच राहणार आहे. बुधवारी याबाबत महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आढावा घेऊन उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागात जंतुनाषकांची फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

दंडोके खावूनही नागरिक रस्त्यावर 
गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावर येणाऱ्या लोकांना पोलिस चोप दित आहेत. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असे असतानाही लोक महत्त्वाच्या रस्त्यावर, गल्लीबोळात अधून-मधून येताना दिसतात. मोटारसायकलस्वारही फिरदाना दिसतात. 

त्यांना पोलिसांचे दंडोके मिळत आहेत. पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही काही नागरिक ऐकत नसल्याचे दिसून येत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तर उठबशा मारण्याची कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर येवू नये. पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वारंवार पोलिस करीत आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख