poor child eye enjury help mla vaje | Sarkarnama

गरीब मुलाचा डोळा वाचला पाहिजे सांगत आमदार वाजेंनी केली धावाधाव, पित्याने धरले पाय ! 

संपत देवगिरे 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नाशिक :खेळतांना मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. हे समजल्यावर आमदार राजाभाऊ वाजे यांनी धावाधाव केली. स्वतः नाशिकच्या नेत्रतज्ज्ञांशी संपर्क करुन तातडीने शश्‍त्रक्रीया करा. पैशांची जबाबदारी मी घेतो असे सांगताच मुलाच्या पित्याने कृतज्ञतेपोटी आमदारसाहेबांचे पाय धरले. हा प्रसंग पाहुन उपस्थित कार्यकर्तेही सद्‌गदीत झाले. 

सिन्नर येथे हा प्रसंग घडला. मैदानामध्ये खेळतांना रोहन सरोदे या मुलाच्या डोळ्यास गंभीर दुखापत झाली. त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात. त्यांच्या पुढे उपचाराचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. त्यांनी आमदार वाजे यांच्याशी संपर्क केला. वाजे यांनी आपल्या कार्यालयातुन प्रथमोपचाराची व्यवस्था केली. प्रथमोपचारानंतर डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी नाशिकला जावे लागेल हा सल्ला दिला. 

पालकांना काही सुचेना. जखमी मुलाच्या गोंधळलेल्या आई- वडिलांना धीर देत आमदार वाजे यांनी ही माहिती घेतल्यावर तत्काळ नाशिकच्या तुलसी आय हॉस्पिटलशी संपर्क साधला. शश्‍त्रक्रीया करण्याची विनंती करीत त्यासाठी लागणारा सर्व खर्चाची जबाबदारी माझी असे सांगितले.

काही ही हो मुलाचा डोळा वाचला. त्याची दृष्टी वाचली. मात्र या आणीबाणीतही धीर व मदतीसाठी धावलेल्या आमदार वाजे यांच्या प्रती कृतज्ञतेने मुलाच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी कृतज्ञतेने आमदार वाजे यांचे पाय धरले. यावेळी कार्यालयात उपस्थित कार्यकर्तेही भावुक झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख