पूनम जोशी तुझ्या देशभक्तीला भारतीयांचा सलाम ! 

पूनम जोशी तुझ्या देशभक्तीला भारतीयांचा सलाम ! 

लंडन : तीन दिवसापूर्वी स्वतंत्र्य दिनाचा जल्लोष भारतातच नव्हे तर जगभरातही झाला. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तामध्येही तिरंगा फडकला. मात्र , यावेळी भारतीय उच्चायुक्‍तालया बाहेर पाकिस्तान आणि खलिस्तान समर्थकांनी विरोध प्रदर्शन केले. ते इतक्‍यावरच थांबले नाहीत तर भारताचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवण्याचा आणि अपमान करण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित भारतीय पत्रकार पूनम जोशी या विरोध प्रदर्शन करणाऱ्यांना भिडल्या. 

ज्यावेळी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्‍तालया बाहेर पाकिस्तान आणि खलिस्तानचे समर्थक तिरंग्याचा अपमान करण्याच्या प्रयत्नात होते, त्यावेळी तेथे उपस्थित भारतीय पत्रकार पूनम जोशी या विरोध प्रदर्शन करणाऱ्यांना भिडल्या. वृत्तसंस्था एएनआयच्या पूनम जोशी पत्रकार आहेत.

त्यांनी पळत जाऊन घोषणाबाजी करणाऱ्यांच्या हातातून तिरंगा हिसकावून घेतला, आणि रस्त्यावर टाकलेला दुसरा तिरंगा देखील तेथून उचलून घेतला. हा व्हिडिओ एएनआयने ट्‌विटरवर टाकल्यानंतर पुनम यांचे अभिनंदन करणारे हजारो संदेश पडले आहे. 

अनेकजण या भारतीय महिला पत्रकाराला ट्‌विटरद्वारे देशअभिमानाच सॅल्यूट ठोकत आहेत. पूनम जोशी आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुझ्या देशभक्तीला सलाम आहे असे ट्विट नेटकऱ्यांनी करीत राष्ट्रध्वजाला सलाम केला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com