राजकारणातील महिला सर्वाधिक ट्रोल, बदनामीकारक ट्‌विटची संख्या जास्त 

राजकारणातील महिला सर्वाधिक ट्रोल, बदनामीकारक ट्‌विटची संख्या जास्त 

नवी दिल्ली : सोशल मीडियाचे एक व्यासपीठ असलेले ट्‌विटर हे भारतीय राजकारणातील महिलांसाठी घातक ठरत आहे. याचे कारण म्हणजे या समाजमाध्यमावरून त्यांना ट्रोल करण्याचे प्रमाण अमेरिका आणि इंग्लंडपेक्षा जास्त आहे, असे निरीक्षण "ऍमेनेस्टी इंटरनॅशनल इंडिया' या संस्थेने ताज्या अभ्यासातून नोंदविले आहे. 

प्रत्येक सात ट्विटपैकी एका ट्विटमध्ये हे त्यांच्यासाठी त्रासदायक आणि त्यांची बदनामी करणारे असते. धमक्‍या, लिंगभेद तसेच धर्म, जात, वर्णद्वेषासंबंधीचा मजकूर अशा ट्‌विटमध्ये असतो, असे "ऍमेनेस्टी इंडिया'च्या अहवालात म्हटले आहे. मार्च ते मे 2019 मध्ये 95 भारतीय राजकारणी महिलांना त्रासदायक ठरणारी दहा लाख ट्विट पोस्ट करण्यात आली. 

याचाच असा की दररोज सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत साधारणपणे प्रत्येक महिला नेत्याबद्दल 113 वाईट ट्विट केले गेले. 95 महिलांच्या एकूण ट्विटमध्ये या ट्विटचे प्रमाण 13.8 टक्के आहे. हे सर्व ट्विट त्रासदायक आणि बदनामीकारक या प्रकारात मोडणारे आहेत. यातील प्रत्येक पाचव्या ट्विटमध्ये लिंगभेद आणि स्त्रीद्वेष डोकावतो. 

मुस्लिम महिला राजकारणी किंवा मुस्लिमधार्जिण्या अशी ओळख असलेल्या महिला नेत्यांबद्दल अन्य धर्मीयांपेक्षा 55.5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ट्‌विट केली गेली आहे, असे अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मागासवर्ग जातींमधील महिला नेत्यांवरील 59 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ट्‌विट हे जातीवर आधारित टीकेची आहेत. 

"ट्रोल पॅट्रोल इंडिया ः एक्‍सपोझिंग ऑनलाइन ऍब्युज फेस्ड बाय वुमेन पॉलिटिशन्स इन इंडिया' अशा शीर्षकाने हे संशोधन सर्वेक्षण, उपलब्ध माहिती आणि यंत्रसामग्रीच्या साहाय्याने केले असल्याचे "ऍमेनेस्टीने सांगितले. सुमारे 95 महिला नेत्यांची 2019मधील तीन महिन्यांच्या काळातील 1.14 लाख ट्‌विटचा अभ्यास केला असता त्यातील 70 लाख ट्‌विट त्यांच्या बदनामीची आहेत, असे सांगण्यात आले. 

"ऍमेनेस्टी'ने हे निष्कर्ष नोव्हेंबर 2019 मध्ये ट्‌विटरला पाठविले आहेत. सार्वजनिक चर्चेपासून फारकत घेणारे, बदनामीकारक आणि "स्पॅम'पासून मुक्त ठेवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे "ट्विटर'ने स्पष्ट केले आहे. मात्र, महिला राजकारणी ज्या प्रकारे ट्रोल झाल्या आहेत, त्यावरून महिला हक्कांचा आदर करण्यात "ट्‌विटर' अपयशी ठरले असल्याची टीका "ऍमेनेस्टी'ने केली आहे. 


ट्विटरवर महिलांची सातत्याने आणि कठोरपणे बदनामी केली जाते. याचा परिणाम म्हणजे यावर कायमच मौन बाळगण्यात येते. 
अविनाश कुमार, कार्यकारी संचालक, ऍमेनेस्टी इंटरनॅशनल इंडिया 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com