उद्धव ठाकरे V/S नितेश राणे - 'त्यांची' शिवभोजन थाळी, तर 'यांची' कमळ थाळी!

कणकवली नगरपरिषद आणि राणे कुटुंबियांच्या पुढाकारातून आमदार राणेनी बुधवारपासून ही कमळ थाळी सुरू केली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवून गरजू लोक उपाशी राहणार नाहीत, या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आमदार राणे सांगत आहेत
Nitesh Rane Challenging Uddhav Thackeray over ShivBhojan Thali
Nitesh Rane Challenging Uddhav Thackeray over ShivBhojan Thali

पुणे : शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यातील वैर नव्या वळणावर आले आहे. शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला टक्कर देण्याकरिता आमदार राणेनी गरिबांसाठी 'कमळ थाळी' सुरु केली आहे

ही थाळी मोफत देण्याची घोषणा केली आहे. शिवभोजन थाळी पाच रुपयात असताना कमळ थाळी मात्र; मोफत देऊन राणे मुख्यमंत्र्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत.  त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि राणे यांच्यात थाळी युद्धाचा अंक सुरू होणार आहे. 

योजनेची व्याप्ती वाढवण्याचा विचार

कणकवली नगरपरिषद आणि राणे कुटुंबियांच्या पुढाकारातून आमदार राणेनी बुधवारपासून ही कमळ थाळी सुरू केली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवून गरजू लोक उपाशी राहणार नाहीत, या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आमदार राणे सांगत आहेत.

कोरोनाची साथ पसरत असल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी. हातावर पोट असलेला घटक अडचणीत सापडला आहे.अशांच्या मदतीसाठी लोक पुढे येत आहेत, तेव्हाच अगदी स्वस्तात धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली; आधी दहा रुपयांत मिळणारी शिवभोजन थाळी पाच रुपयांत देण्यात येत आहेत. मात्र, गरज लक्षात घेता शिवभोजन थाळी अपुरी ठरत असल्याकडे राणेंनी लक्ष वेधले होते. तेव्हाच, नेमक्या गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी आमदार राणेनी थेट थाळीचा उपक्रम सुरू करून शिवसेना नेतृत्वाला पुन्हा आव्हान दिले आहे.

थाळी सुरु करण्यामागे राजकीय उद्देश नसल्याचा दावा

त्याशिवाय, मूळ कोकणातील मात्र मुंबईत राहात असलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी खासदार नारायण राणे यांच्यासह नितेश, निलेश यांनीही आपल्या कार्यकत्यांची मोठी फौज उभारली आहे. त्यातून ज्येष्ठ नागरिकांना धान्यपासून औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

आपल्या नव्या कमळ थाळीबत आमदार राणे म्हणतात, "लोकांना रोज किमान दोन वेळचे जेवण मिळायला हवे. मात्र, सरकार ते करू शकत नाही. अशा परिस्थितीतही शिवभोजन थाळीचे पाच रुपये घेणे योग्य नाही. आम्ही गरीबांसाठी मोफत जेवण देऊ, मात्र ही थाळी राजकीय उद्देशाने सुरू केलेली नाही."

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com