बिगर राजकीय सदस्यांच्या नियुक्तीत नेत्यांचा राजकीय वरदहस्त

फक्त सल्ला घेण्यापर्यंत मर्यादीत असलेल्या महापालिका प्रभाग समित्यांवरील बिगर राजकीय सदस्यांच्या नियुक्‍त्या आज झाल्या. मात्र, त्यातही मोठे राजकारण झाले आहे. बिगर राजकीय नियुक्ती हा निकष असतांनाही निवडणुक लढविलेले, राजकीय पक्षांशी संबंधीत सदस्यांची नियुक्ती झाली.
बिगर राजकीय सदस्यांच्या नियुक्तीत नेत्यांचा राजकीय वरदहस्त

नाशिक : फक्त सल्ला घेण्यापर्यंत मर्यादीत असलेल्या महापालिका प्रभाग समित्यांवरील बिगर राजकीय सदस्यांच्या नियुक्‍त्या आज झाल्या. मात्र, त्यातही मोठे राजकारण झाले आहे. बिगर राजकीय नियुक्ती हा निकष असतांनाही निवडणुक लढविलेले, राजकीय पक्षांशी संबंधीत सदस्यांची नियुक्ती झाली. शिवसेना, भाजपने आपल्या समर्थकांची वर्णी लावली. मात्र, पश्‍चिम प्रभागातील नियुक्तीत मनसेच्या सभापतींनी भाजपच्या महिला आमदाराच्या सुचनेला लाल फुली मारली.

पश्‍चिम प्रभागात किशन अडवाणी, पोपट नागपुरे आणि श्रीसंत श्रीराम यांची नावे जाहिर झाली. त्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांचे फोटोसेशन झाले. यादरम्यान भाजपच्या नगरसेविका स्वाती भामरे यांना शहरातील महिला आमदाराचा फोन आला. आमदारांचा दिपक जाधव यांच्या नावासाठी आग्रह होता. जाधव यांचे नाव समाविस्ट करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. त्यावेळी सभापती अॅड. वैशाली भोसले यांनी सर्व नगरसेवकांची संमती असेल तरच नागपुरे यांचे नाव रद्द करीन अशी भूमिका घेतली. यावर चर्चा सुरु असतांनाच एक, एक नगरसेवकांने कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे नागपुरे यांचे नाव कायम राहिले.

महापालिकांच्या प्रभाग समित्यांवर बिनसरकारी संस्था, समाजलक्षी संघटनांच्या प्रत्येकी तीन सदस्य नियुक्ती आज झाली. फक्त सल्ला देण्यापुरतीच ही नियुक्ती असते. नाशिक महापालिकेत यापुर्वी ही नियुक्ती होत नव्हती. मात्र भाजपच्या सत्ताकाळात नामनिर्देशित सदस्य नियुक्तीचा पायंडा सुरु झाला. त्यानुसार आज या नियुक्‍त्या झाल्या. मात्र, त्यात राजकीय पक्षांच्या व्यक्तींना स्थान देवू नये हा नियम बाजुला सारण्यात आला. त्यात सर्वचं पक्ष एकदिलाने सहभागी झाले.

नाशिकरोड विभागात अशोक तापडीया, शंकर साडे व कांता वराडे ह्या भाजपचे सदस्य असलेल्या व्यक्ती आहेत. सातपुरमध्ये दशरथ लोखंडे, विजय भंदुरे शिवसेनेशी संबंधित आहेत. सिडकोमध्ये धनाजी लगड या भाजपशी संबधित व्यक्तीची नियुक्ती झाली. पुर्व प्रभागात मध्ये माजी आमदार वसंत गिते समर्थक भुषण महाजन यांची नियुक्ती झाली. पंचवटीत अनिल वाघ हे शिवसेनेशी संबंधित आहे.

महेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेची उमेदवारी केली होती. पश्‍चिम प्रभागात शिवसेना समर्थक श्रीसंत विवेक श्रीराम, यापुर्वी भाजपची उमेदवारी केलेले किसन होलाराम अडवाणी यांची नियुक्ती झाली. मनसे, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकमताने पोपट नागपुरे यांचे नाव आले होते. यामध्ये सतरा पैकी नाशिक रोड येथील कांता वराडे व सिडकोतील सौ. पंकज संधान या दोनचं महिलांना संधी मिळाली. बहुसंख्य महिलांना नियुक्तीत डावलण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com