भाजप आमदार सुरेश भोळेंनेही घेतली शिवसेनेच्या संजय सावंताची भेट

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यानीं शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी तसेच इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. भाजप नेते एकनाथखडसे शिवसेनेच्या वाटेवर असल्याने त्या दृष्टीनेही त्यांची जिल्ह्यातील ही भेट महत्वाची मानली जात आहे.
BJP Mla Suresh Bhole Met Shivsena Mla Sanjay Sawant
BJP Mla Suresh Bhole Met Shivsena Mla Sanjay Sawant

जळगाव : राज्यात शिवसेना व भाजपची युतीत मतभेद सुरू असतांनाही शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत व भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये भेट घेतल्याने जिल्हयात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र आमदार भोळे व सावंत यांनी ही केवळ आमची सदिच्छा भेट होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यानीं शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी तसेच इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. भाजप नेते एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर असल्याने त्या दृष्टीनेही त्यांची जिल्ह्यातील ही भेट महत्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे खडसे यांची निकटचे सहकारी व भाजपचे माजी आमदार डॉ,गुरूमुख जगवानी व शिवसेनेचे संजय सावंत एकाच विमानाने जळगावात आले. त्यामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. सावंत यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व आमदारांच्या भेटी घेतल्या आहेत.

जळगाव येथील भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचीही त्यांनी एका हॉटेल भेट घेतली. त्यांनी अर्थातास चर्चा केली. याबाबीत सावंत यांना विचारले असता, ते म्हणाले कि आम्ही युती असतांना एकत्र काम केले आहे.विधानसभा निवडणूकीनंतर प्रथमच आपण जळगावला आलो त्यामुळे त्यांनी आपली ही भेट घेतली. तर आमदार सुरेश भोळे यांनीही तेच सांगितले. ते म्हणाले, ''लोकसभा व विधानसभेत युती असतांना शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख म्हणून आम्ही सोबत काम केले आहे. युती असतांना ते नेहमी समन्वय साधायचे विधानसभा निवडणूकीनंतर ते प्रथमच जळगावला आल्यामुळे आपण त्यांची एक सदिच्छा भेट घेतली. मात्र कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com