Political pressure hampers water conservation | Sarkarnama

राजकीय दबावात अडकले जलयुक्त शिवार ? जिल्ह्यातील कामांची होणार तपासणी

संपत देवगिरे - सरकरनामा ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

नाशिक: राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या लाभार्थी निवड करतांना राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.  त्यात वाढ होत असल्याने या कामांची भरारी पथकाकडून तपासणी होणार आहे. 

नाशिक: राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या लाभार्थी निवड करतांना राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.  त्यात वाढ होत असल्याने या कामांची भरारी पथकाकडून तपासणी होणार आहे. 

यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी तसेच राधाकृष्णण बी. व कषी अधीक्षक टी.एम.जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध अशा विविध जलसंधारणाच्या कामांची सत्य वस्तुस्थीती जाणुन घेण्यासाठी पुढील आठवड्यापासुन भरारी पथकाद्वारे तपासणी करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. अधीकाऱ्यांनी अचानक जाऊन प्रत्येक तालुक्‍यात चार ठिकाणी कामांची पाहणी करावी. जेणे करुन कामाचा दर्जा स्पष्ट होईल. त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करता येतील. काम निकृष्ट असल्यास संबंधीत ठेकेदारांचे बिल रोखता येईल. 

बहुतांश शेततळी राजकीय नेते तसेच राजकीय शिफारशी असलेल्या लाभार्थीर्ंची असतात. त्याबाबत अनेक तक्रारी आल्याचे बोलले जाते. यंदा नऊ हजार शेततळी बांधण्याचे उद्दीष्ट आहे. मात्र केवळ दोन हजार अर्ज आल्याने नवे लाभार्थी शोधण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख