'आता थांबवाय लागतंय'!...फलकांमुळे कागलचे राजकारण तापले  

रातोरात लावलेल्या या फलकांवरील मजकुराचा प्रत्येक राजकीय गट आपल्या सोयीने अर्थ लावताना दिसत आहेत.
'आता थांबवाय लागतंय'!...फलकांमुळे कागलचे राजकारण तापले  

कोल्हापूर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवदेनशील असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी लावलेले 'आता थांबवाय लागतंय!' अशा आशयाचे फलक चर्चेचे विषय ठरले आहेत. अज्ञातांनी लावलेल्या या फलकांमुळे कागलची राजकीय हवा मात्र चांगलीच तापली आहे.

हे फलक कोणी लावले आहेत याची माहिती नाही पण विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना उद्देशूनच हे फलक लावल्याची चर्चाही मतदारसंघात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कागल दौऱ्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा फलक युध्द चांगलेच रंगले होते. एका बाजूला श्री. मुश्रीफ यांचा गौरव करणारे फलक तर त्याला लागूनच 'म्हाडा' चे अध्यक्ष समरजतिसिंह घाटगे यांचे कौतुक करणारे फलक उभारून कार्यकर्त्यांनी चांगलीच हवा निर्माण केली होती. आता या नव्या फलकामुळे वातावरण गरम असले तरी त्यातून वादावादीचीही शक्‍यता वर्तवली जात आहे.

कागल-निढोरी राज्य मार्गावर दुतर्फा असलेल्या झाडे, घरांच्या भिंती, पाणीपुरवठ्याच्या पाईप, एसटीचे निवारा शेडवरील फलक चर्चेत आले आहेत. फलकाच्या डाव्या कोपऱ्यात लहान आकारात 'एस सी' असे इंग्रजी शब्द आहेत. इतर वेळी शुभेच्छुकांच्या नावाने भरलेले फलक दिसतात. यावर कोणाचेही नाव नाही. या मोजक्‍या अक्षरातील मजकुराच्या फलकांनी नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कागलसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील व जागरूक तालुक्‍यात या फलकांनी वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. रातोरात लावलेल्या या फलकांवरील मजकुराचा प्रत्येक राजकीय गट आपल्या सोयीने अर्थ लावताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सुद्धा हे फलक व्हायरल केले जात आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com