राष्ट्रपती राजवटीच्या शिफारसीबद्दल राजकीय पक्षांचा विरोध

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याबद्दल विविध राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांची ही शिफारस घटनाबाह्य असल्याचे या राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. आज दुपारी राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे.
Bhatatsinh Koshyare Governor of Maharashta
Bhatatsinh Koshyare Governor of Maharashta

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याबद्दल विविध राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांची ही शिफारस घटनाबाह्य असल्याचे या राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. आज दुपारी राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. 

राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रात्री साडेआठ वाजेपर्यंतची मुदत दिली होती. असे असताना त्यापूर्वीच ते राष्ट्रपती राजवटीची शिफारस कशी करु शकतात, असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी ट्वीटर वरुन उपस्थित केला आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत यांनीही राष्ट्रपती राजवटीला विरोध केला असून त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दाखला देत ट्वीट केले आहे. हा निर्णय राजकारण विरहित असणे अपेक्षित आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनीही या निर्णयावर टिका केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करायचे हे यापूर्वीच ठरले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, राज्यपालांनी राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपेपर्यंत थांबायला हवे होते, प्रथमदर्शी हे घटनेच्या विरोधातले पाऊल आहे, असे संजय निरूपम यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com