Political Parties have to produce Aadhar Card to Stake Claim in Nagpur Zilla Parishad | Sarkarnama

नागपूर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी 'आधार' बंधनकारक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा दावा तसेच गट स्थापन करण्यासाठी दावा करताना सर्व सदस्यांचे आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशा सदस्यांची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जाणार नाही

नागपूर  : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा दावा तसेच गट स्थापन करण्यासाठी दावा करताना सर्व सदस्यांचे आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशा सदस्यांची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जाणार नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे सर्वाधिक 30 सदस्य निवडून आले आहेत. बहुमताचा आकडा गाठल्याने कॉंग्रेसच दावा करणार हे स्पष्ट आहे. महाआघाडीत त्यांच्यासोबत राष्ट्रवादीसुद्धा होती. राष्ट्रवादीचे एकूण 10 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आता जोडतोडची कुठलीही शक्‍यता राहिलेली नाही. 18 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. तत्पूर्वी, याकरिता प्रथम गट व गट नेत्याची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्व पक्षांना करावी लागणार आहे. 

निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप एकाही पक्षाने गट, गट नेत्याच्या नोंदणीसाठी अर्ज केला नाही. पक्षाला बैठक घेऊन गट नेत्याच्या निवडणुकीच्या ठरावाची प्रत निवडणूक विभागाला द्यावी लागणार आहे. निवडलेल्या गट नेत्याकडून उमेदवारांच्या स्वाक्षरीची यादी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागेल. या नावासोबत संबंधित सदस्याच्या आधार कार्डची प्रतही जोडावी लागणार आहे शिवाय शपथपत्रही द्यावे लागेल. आधार कार्ड नसल्याने संबंधित सदस्य ग्राह्य न धरल्यास मोठी अडचण होण्याची शक्‍यता आहे. 

जवळपास आठ वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या 58 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसला सत्ता स्थापनेची संधी चालून आली आहे. भाजपला 15, राष्ट्रवादीला 10, एक जागा शिवसेना तर एक शेकापला मिळाली. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख