रात्रीच खेळ चाले...उमेदवारांच्या गनिमीकाव्याचा 

एका रात्रीत एकगठ्ठा मते बदलणारी एक विशिष्ट यंत्रणा सध्या दोन्ही उमेदवारांसाठी काम करत असल्याचे दिसते. या यंत्रणेकडून रोख पैसे वाटप किंवा विविध स्वरुपाचे गिफ्ट स्वरुपात मतदारांना अंधारात पोहचवले जाते.
liquior-Money.
liquior-Money.

भिवंडी :  लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुमशान जोरामध्ये सुरु झाली आहे उमेदवारांसह पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस अगदी जवळ आला आहे. त्यामुळे प्रचाराची तंत्रेही गनिमी कावा पद्धतीने सुरू झाली आहेत.

 यामध्ये रात्रीच्या वेळी पैसे तसेच गिफ्ट वाटप करण्याचा पारंपरिक निवडणुकांचा फंडा सुरू झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या या गनिमीकाव्याने आपली हक्काची मते फुटतील  या भीतीने प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या यंत्रणांनी जागते रहोचे  आवाहन केले आहे .  खास नाईट ड्युटी करणाऱ्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहे. रात्रीस खेळ चाले... असे म्हणत गावागावांत या नाईट ड्युटीवरील पथकांची चर्चा जोरदार सुरू झाली आहे . भाजप , कॉग्रेस , वंचित आघाडी ,समाजवादी पक्षासह अपक्ष उमेदवारांचे पदाधिकारी पक्षाच्या प्रचार कार्यालयात बसून गनिमी काव्याचे डावपेच लढवीत आहेत . 

भिवंडी लोकसभा मतदार संघात येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीच्या रिगणात भाजप ,कॉग्रेस ,समाजवादी पक्ष ,वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिगणात असले तरी या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप विरुद्ध कॉग्रेस अशी सरळ  लढत असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभा निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

एकीकडे प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. परस्पर उमेदवारांवर व्हॅटआप व फेसबुक या सोशल मीडियातून टीका-टिप्पणीलाही सुरुवात झाली आहे. भिवंडी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या भिवंडी सह कल्याण पश्‍चिम ,मुरबाड ,शहापूर आदी सहा विधानसभा क्षेत्रात कोण उमेदवार निवडून येणार यावर पैजा लागल्या आहेत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणत स्थानिक आघाड्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे दिसते.

निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. 29 एप्रिल रोजी मतदान असल्याने आता काही संवेदनशील भागात रात्रीही विरोधकांच्या यंत्रणेवर पदाधिकारी लक्ष ठेवले जात आहे. आदर्श आचारसंहितेनुसार रात्री दहानंतर कसलाही प्रचार करण्यास निर्बंध आहेत.असे असले तरी आचारसंहिता पथकांचे डोळे चुकवून प्रचार होतो हे उघड वास्तव आहे. यासह अखेरचा टप्पा असल्याने दिवसापेक्षा रात्रीच्या अंधारात मोठ्या घडामोडी घडत असल्याचेही ओपन सिक्रेट आहे. 

एका रात्रीत एकगठ्ठा मते बदलणारी एक विशिष्ट यंत्रणा सध्या दोन्ही उमेदवारांसाठी काम करत असल्याचे दिसते. या यंत्रणेकडून रोख पैसे वाटप किंवा विविध स्वरुपाचे गिफ्ट स्वरुपात   मतदारांना अंधारात पोहचवले  जाते. पैसै कुठे आणि कशा पध्दतीने वाटायचे, गिफ्ट कसे द्यायचे याचे नियोजन मुळात निवडणुकीपूर्वीच तयार असल्याने आता फक्त रात्रीच्या अंधारात अंमलबजवणी सुरु झाली आहे. निवडणुकीतील ईर्षेमुळे अपवाद वगळता बहुतेक उमेदवारांकडून हा रात्रीचा खेळ खेळला जात असल्याने यापूर्वी याबाबत तक्रारी केल्या जात नव्हत्या. 

मात्र या निवडणुकीत एक-एक मतांची बेगमी करण्यावर भर दिसू लागला आहे याचा परिणाम आपल्या एकगठ्ठा मतांच्या क्षेत्रात प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अमिष दाखवून मते फोडू नयेत यासाठी खास पथके तैनात झाली आहेत.आचारसंहिता पथक व पोलिसांच्या गस्तीपथकांच्या नजरेस पडू नये यासाठी ही पथके कार्यकर्त्यांच्या घरात व खासगी ऑफिस कार्यलयात ठिय्या मांडून बसवण्यात आली आहेत. हालचाली टिपण्यासाठी अनेकांनी जाणीवपूर्वक काही कार्यकर्त्यांची  पथक नेमली आहेत.  मतदानाचा दिवस जवळ येईल तसा अधिकच आक्रमक होऊन एकमेकांच्या  पथकांवर हल्ले-प्रतिहल्ले होतील  असे दिसू लागले आहे. 

रात्री किंवा पहाटेच्या सुमारास स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नियोजीत ठिकाणी खासगी सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने  घरांमध्ये प्रचारपत्रके वाटण्याच्या बहाण्याने पैसे वाटप केले जात असल्याचे प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे . कल्याण रोड ,साईबाबा नाका ,कारीवाली ,शेलार ,खाडी पार ,अंबाडी ,पडघा ,कोन आदी ठिकाणांसह आचारसंहिता पथकाची भरारी पथक नेमण्यात आली आहेत आता पर्यंत सुमारे 40 लाखापर्यंत रोख रक्कम पकडण्यात आली आहे त्यामुळे राजकीय पक्षांकडून अर्थकारण करताना रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेतली जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com