आदित्य ठाकरेंच्या विनम्रतेचे अधिवेशनात कौतुक - politeness of aditya appreciated by leaders | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरेंच्या विनम्रतेचे अधिवेशनात कौतुक

उमेश घोंगडे
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

....

मुंबई : पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे आज विधानसभेत आले. मात्र, त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले जनगणने संदर्भात केंद्र सरकारकडून आलेले पत्र वाचत होते. सभागृहातील संकेताप्रमाणे अध्यक्ष उभे असतील तर सभागृहात येणारा सदस्य जागेवरच उभा राहतो.

अर्थात अदित्य यांना याची माहिती नव्हती. ज्येष्ठ सदस्यांनी ही बाब लक्षात आणूदन देताच ते जागेवर उभे राहिले. मात्र, ही गोष्ट अध्यक्ष पटोले यांच्या लक्षात येताच ते स्वत: आसनावर बसले व अदित्य यांना बसण्यास सांगितले. अदित्य जागेवर बसताच पटोले यांनी पुन्हा उभे राहून पत्र वाचायला सुरवात केली. चूक लक्षात आल्यानंतरची अदित्य यांची नम्रता व नव्या सदस्याला समजून घेत त्याला सहकार्य करण्याचा अध्यक्षांचा मोठेपणा या दोन्हींचे प्रत्यंतर आज सभागृहात आले.

प्रथमच आमदार झाल्यानंतर अदित्य थेट कॅबिनेट मंत्री झाले. मात्र, नव्या सरकारच्या सुरवातीपासूनच अदित्य यांची नम्रता आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनाची कायमच माध्यमातून चर्चा होत असते. आज सभागृहात त्याचे पुन्हा प्रत्यंतर आले. या सरकारमधील तरूण मंत्री असलेल्या अदित्य ठाकरे यांचा एकुणच वावर अत्यंत्र नम्र आणि विनयशील राहिला आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, कॅबिनेट मंत्री असा कोणताही बडेजाव त्यांच्या वागण्या-बोलण्यात जाणवत नाही. त्यांच्या गुणाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीरपणे कौतुक केले होते. मात्र त्याचा प्रत्यय या अधिवेशनात अनेकांना आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख