मंत्रालयातील निलंबित सचिवाकडे सापडली 16 जिवंत काडतुसे

भरत पाटील यांच्यासह अन्य तिघांनी दिवशी बुद्रूक येथील शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडविला होता. त्याबाबत विचारणा केली असता पांडूरंग सुर्यवंशी यांना मारहाण करून त्यांच्या डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याची धमकी दिली.
patan
patan

पाटण (जि. सातारा) :  शेतकऱ्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचा निलंबित अतिरिक्त सचिव भरत आत्माराम पाटील यांच्या हवेली (ता. पाटण) येथील निवासस्थानातून पोलिसांनी आज ४२ मि.मि. रिव्हॉल्व्हरची १६ काडतुसे जप्त केली आहेत. श्री. पाटील मात्र, अद्यापही फरार असल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली.

पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील शेतकरी पांडुरंग विठ्ठल सुर्यवंशी यांच्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचा निलंबित अतिरिक्त सचिव भरत आत्माराम पाटील याच्यावर काल गुन्हा दाखल झाला होता. 


यासंदर्भात पाटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत पाटील यांच्यासह अन्य तिघांनी दिवशी बुद्रूक येथील शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडविला होता. त्याबाबत विचारणा केली असता पांडूरंग सुर्यवंशी यांना मारहाण करून त्यांच्या डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी भरत पाटीलसह अन्य तिघांपैकी एक अनोळखी अशा चार जणांविरूद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी यातील जितेंद्र सुर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाकडून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर याच गुन्ह्यातील एक अल्पवयीन मुलालाही चौकशीस ताब्यात घेतले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com