police work like bjp workers : Chavan | Sarkarnama

पोलिस, शासकीय अधिकारी हे भाजपचे हस्तक बनलेत : अशोक चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

जळगाव : फडणवीस सरकारचा पोलीस तसेच प्रशासकीय कामात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढला आहे. सर्वच ठिकाणी नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिंसासह सर्वच अधिकाऱ्यांना आता भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करण्यास भाग पाडले जात आहे. असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.

जळगाव : फडणवीस सरकारचा पोलीस तसेच प्रशासकीय कामात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढला आहे. सर्वच ठिकाणी नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिंसासह सर्वच अधिकाऱ्यांना आता भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करण्यास भाग पाडले जात आहे. असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.

जळगाव येथे ते "परामर्श..बुद्धिवंतांचा' या कार्यक्रमात बोलत होते. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील वैद्यकिय, बांधकाम, अकौटंट, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी विचारलेल्या प्रश्‍नाला ते उत्तर देत होते.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना ते म्हणाले, कि राज्यात कायदे आहेत, परंतु त्याची अमंलबजावणी केली जात नाही. सत्ताधारी पक्षाचा राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सत्तेत असलेला भारतीय जनता पक्षा त्याचा वापर करीत आहे. प्रशासनातील जागा रिक्त ठेवून सत्ताधारी पक्षाच्या विचारणीचा व्यक्ती मिळेपर्यंत त्या राखीव ठेवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. भाजप कार्यकर्ता म्हणूनच आज प्रशासकीय, पोलीस विभागातील अधिकारी काम करीत आहे. राज्यातीही ही परिस्थीती अतीशय गंभीर आणि धोकादायक आहे. 

जीएसटी प्रणाली बदलणार 

सरकारने लावलेल्या जीएसटी कराबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना चव्हाण म्हणाले,जीएसटी लावण्याच्या निर्णय आमच्या सरकारच्या कालावधीतच घेण्यात आला होता. मात्र या सरकारने तो आणला परंतु तो चुकिच्या पध्दतीने लावला त्यामुळे तो आता जाचक झाला आहे. आमचे सरकार आल्यास आम्ही निश्‍चित त्यात बदल करणार आहोत. "एक राष्ट्र, एक कर'हेच आमचे धोरण राहणार आहे. 

सामाजिक वाटणी घातक

 
देशातील व राज्यातील सरकार समाजा-समाजात सामाजिक संघर्ष उभा करून त्या माध्यमातून आपली मतपेटी भरण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप करून चव्हाण म्हणाले, निवडणूका आल्या कि मंदीर, मशिद,असे प्रश्‍न उपस्थित सामाजिक प्रश्न उपस्थित करून त्यातून आपला राजकीय डाव साधण्याचा भाजपचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. समाजात पडणारी ही वाटणी घातक आहे.

यावेळी माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात, रत्नाकर महाजन, प्रवक्ते सचीन सावंत, आमदार भाई जगताप, विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सत्यजीत तांबे, आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख