विक्की नगराळेवर पोलिसांची चोवीस तास नजर!

police wacth on vikky nagrale in nagpur jail
police wacth on vikky nagrale in nagpur jail

नागपूर : हिंगणघाट खूनप्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिंगणघाट कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आले होते. त्याने कारागृहात असताना आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पसरली होती. मात्र, विक्कीवर पोलिस चोवीस तास नजर ठेवून आहेत, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

विक्की नगराळेने 3 फेब्रुवारीला प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिच्यावर पेटोल फेकले होते. त्यानंतर तिला पेटवून दिले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आठ दिवसानंतर तिचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडात आरोपी विक्की नगराळे याला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली होती, परंतु जनक्षोभ पाहता विक्कीची रवानगी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. गेल्या 16 तारखेला त्याने कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अफवा उडाली होती. मात्र, विक्कीने आत्महत्येचा कोणताही प्रयत्न केला नसल्याची प्रतिक्रिया कारागृह अधीक्षक अनुप कुंभरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com