police teams search for mangaldas bandal | Sarkarnama

मंगलदास बांदल यांच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना

नितीन बारवकर
बुधवार, 10 जुलै 2019

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल व विद्यमान सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली असून आम्ही त्यांना लवकरच अटक करू, असे शिरूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.

शिरूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या बड्या नेत्यांवर फसवणूक व बेकायदा सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार, याची उत्सुकता आहे.

यााबाबत सारंगकर यांनी सांगितले की आम्ही त्यांचा ठावठिकाणा शोधत आहोत. त्यासाठी पोलिस त्यांच्या मागावर आहेत. मंगलदास बांदल यांच्याविरूद्ध फसवणूकीचा; तर राजेंद्र जगदाळे यांच्याविरूद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या विषयाचा पोलिस कसून तपास करीत असून, या स्वतंत्र प्रकरणातील दोघांचाही सहभाग स्पष्ट झाल्यानेच गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांविरूद्ध आणखी कुणाच्या तक्रारी असतील किंवा फसवणूक, सावकारीचा त्रास होत असेल त्यांनी न भिता पोलिसांकडे तक्रारी दाखल कराव्यात. संबंधितांना निश्‍चितच न्याय मिळवून दिला जाईल,`` अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.

हे दोन्ही आरोपी अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस त्यांना कधी अटक करणार, याविषयी विविध चर्चा आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख