मी येणार, कोंबड्या चोरताना पहायला : सीएम विरोधातील फलक कोल्हापूरात हटविले

मी येणार, कोंबड्या चोरताना पहायला : सीएम विरोधातील फलक कोल्हापूरात हटविले

कोल्हापूर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील आज शहरात निघालेल्या महाजनादेश यात्रेविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व विद्यार्थी कॉंग्रेसने यात्रेच्या मार्गावर उभारलेले सरकारविरोधातील टिकेचे फलक पोलिसांनी रात्रीत काढले. यात्रेच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या फलकाला लागूच हे फलक उभारण्यात आले होते.

"मी पस्तावतोय' अशी टॅगलाईन वापरून उभारलेल्या या फलकावर सरकारबरोबरच भाजपा नेत्यांच्या बेताल वक्तव्यावर टिका करणारा मजकूर लिहला होता. हॉटेल पंचशीलसमोरील परिसर, स्टेशन रोड, दसरा चौकात आदि भागात हे फलक काल रात्री उशीरा उभारण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच पहाटेच मुख्यमंत्री औरंगाबादला रवाना होण्यापुर्वीच ते उतरवण्यात आले. फलक उभा करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत असल्याचे समजते.

"महाजनादेश यात्रेसाठी जेवढी सरकारी यंत्रणा लावली तेवढी महापुराच्या काळात लावली असती तर ब्रम्हनाळसारखी घटना घडली नसती', "वाचाळवीरांचे थर म्हणून लावलेल्या फलकावर भाजपा आमदार राम कदम यांच्या फोटोखाली "मी मुली पळवणारच', आमदार परिचारक यांच्या फोटोखाली "मी सैनिकांचा अपमान करणारच' असा तर खासदार रावसाहेब दानवे यांच्या नावाखाली "शेतकऱ्यांना शिव्या देणारच', मंत्री गिरीश महाजन यांच्या फोटोखाली "तुम्ही पुरात बुडा, मी सेल्फी घेणारच' असा मजकूर लिहला होता.

व्हीनस कॉर्नर चौकात राजाराम महाराज पुतळ्यासमोर उभारलेल्या एका फलकावर तर गड-किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर टिका करताना "ज्यांचे नांव घेऊन सत्तेवर आले, त्यांचेच किल्ले भाड्याने द्यायला काढले' असा मजकूर लिहला होता. कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकरणी तर एका फलकावर "मी परत येणार, कोंबडी चोरताना पहायला' असा मजकूर लिहला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com