#CoronaEffect दोनशे पाहुण्यांचा केला स्वयंपाक आणि आचाऱ्याचाच झाला 'पाहुणचार'

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जमावबंदी आणि संचारबंदीही लागू करण्यात आली आहे; तसेच सगळे सामाजिक कार्यक्रम, विवाह समारंभ; तसेच स्वागत समारंभ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनीही तसेच आदेश जारी केले आहेत. मात्र, ग्रामीण भागात याची पायमल्ली होत आहे
Police Stopped Wedding Reception in Gondia
Police Stopped Wedding Reception in Gondia

गोंदिया  : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्‍यातील घाटटेमणी या गावात लग्नाप्रीत्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल दोनशे नातेवाइकांच्या जेवणाची तयारी सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले आणि त्यांनी त्यांच्या स्टाईलने संबंधितांना दमदेखील दिला. तिथे स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याला तर पोलिसांचा चोपही मिळाला.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जमावबंदी आणि संचारबंदीही लागू करण्यात आली आहे; तसेच सगळे सामाजिक कार्यक्रम, विवाह समारंभ; तसेच स्वागत समारंभ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनीही तसेच आदेश जारी केले आहेत. मात्र, ग्रामीण भागात याची पायमल्ली होत आहे. अजूनही नागरिकांना या आजाराचे गांभीर्य लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने तसेच माध्यमांमधून सतत याविषयीची जागृती सुरू आहे, तरीही लोकांनी आपले कार्यक्रम, समारंभ सुरूच ठेवले आहेत.

जिल्हा प्रशासन नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्रित येण्याकरिता मज्जाव करीत असले, तरी असे प्रकार ग्रामीण भागात सर्रास सुरू आहेत. तर घडलेल्या प्रसंगी आयोजकाविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापुढे अशा समारंभास मज्जाव करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com