आमदार नरके आणि उल्हास पाटलांना पोलिसांनी विचारलं, तुम्ही कोण?

आमदार नरके आणि उल्हास पाटलांना पोलिसांनी विचारलं, तुम्ही कोण?

मुंबई : मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसवर कोल्हापूरमधील शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील आणि आमदार जयप्रकाश मुंदडा यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र 'तुम्ही कोण' असा प्रश्न विचारत पोलिसांनी आमदारांना आतमध्ये न सोडल्याने पोलीस आणि आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अखेर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर या आमदारांना आत सोडण्यात आले.

पुरामध्ये कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचे आमदार आले होते. मात्र पोलिसांनी 'प्रोटोकॉल'चा मुद्दा पुढे करत या आमदारांना सह्याद्री गेस्ट हाऊसच्या गेटवर रोखत आत सोडण्यास नकार दिला.

यामुळे आमदार आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. कॅबिनेटच्या बैठक संपल्यानंतर घडला प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना पूरग्रस्तांच्या बैठकीसाठी आत बोलवलं आणि मानापमानाचं हे नाटक संपले.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना अडीच एकरी 60 हजार रुपयांची मदत देणार, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं नाही त्यांना हेक्टरी 39 हजार रुपये मदत केली जाणार, उसाचं गाळप करणाऱ्या गुरांळाना बांधकामासाठी 50 हजार  देणार, राज्य सरकारच्या अध्यादेशामधील जाचक अटी काढून सरसकट मदत करणार,तसेच ज्या शेतकऱ्यांचा ऊस रानात  कुजतोय त्या शेतकऱ्यांचा ऊस रानातून बाहेर काढण्यासाठी रोजगार हमी योजनेचा निधी आणि कामगार वापरणार याबाबत बैठकीत निर्णय झाल्याचे समजते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com