फड तमाशाचा; अड्डा जुगाराचा : पोलिसांनी केली कारवाई 

फड तमाशाचा; अड्डा जुगाराचा : पोलिसांनी केली कारवाई 

नारायणगाव : येथील तमाशा पंढरीत लावण्यात आलेल्या राहुटीत जुगार खेळणाऱ्या फडमालकासह सहा जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे दीड हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे, अशी माहिती सहायक फौजदार के.डी.ढमाले यांनी दिली. 

या प्रकरणी फडमालक मुसाभाई याकूब इनामदार, फड व्यवस्थापक तानाजी नामदेव मुसळे, देविदास बबन सुपेकर, उत्तम सखाराम ढवळे, दत्तात्रेय गंगाराम संभेराव, खलाल शेख गफूर या सहा जणांवर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींना नोटिसा बजावल्या आहेत. 

तमाशा पंढरी म्हणून नारायणगावचा नावलौकिक आहे. तमाशा खेळाची नोंदणी करण्यासाठी राज्यातील फडमालक दरवर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान नारायणगाव येथे राहुट्या उभारतात. नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने राहुट्या उभारण्यासाठी फडमालकांना मोफत जागा, वीज, पाणी आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तमाशाचे बुकिंग करण्यासाठी फडमालकांनी खोडद येथील रस्त्यालगत राहुट्या उभारण्यास सुरवात केली आहे. उभारण्यात आलेल्या एका राहुटीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी (ता.27) दुपारी दोन वाजता नारायणगाव पोलिसांनी येथील राहुटीत छापा टाकून जुगार खेळत असलेल्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला. 

माहीती व तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक कला जोपासण्याचे काम करणाऱ्या तमाशाकडे प्रेषकांनी पाठ फिरवली आहे. या मुळे राज्यातील फडमालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत फडमालक व व्यवस्थापक राहुट्यात जुगार खेळून पैशाचा अपव्यय करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com