police officers transfers | Sarkarnama

पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

गृह विभागाने गुरुवारी (ता. 4) 15 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. पोलिस उपायुक्त डॉ. रश्‍मी करंदीकर यांच्यावर मुंबई पोलिसांच्या प्रवक्‍त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

मुंबई : गृह विभागाने गुरुवारी (ता. 4) 15 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. पोलिस उपायुक्त डॉ. रश्‍मी करंदीकर यांच्यावर मुंबई पोलिसांच्या प्रवक्‍त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गृह विभागाने बढती दिली होती. त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. मुंबई पोलिस दलातही अनेक बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते अशोक दुधे यांची वाहतूक विभागात (शहरे) बदली करण्यात आली. ठाण्याच्या पोलिस उपायुक्त डॉ. रश्‍मी करंदीकर यांच्याकडे मुंबई पोलिसांचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलिस अधिकारी पूर्णवेळ प्रवक्ता म्हणून काम करणार आहे. 

नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत बदली झाली आहे. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत दहशतवादी घुसल्याची अफवा होती. त्या वेळी सावंत यांनी उरण, मोरागाव, जेएनपीटी परिसर पिंजून काढला होता. पश्‍चिम रेल्वेचे पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांची बदली महिला व अत्याचारविरोधी कक्षात करण्यात आली आहे. 

अधिकाऱ्याचे नाव नवीन नियुक्तीचे ठिकाण 

अखिलेश कुमार सिंग : परिमंडळ 3 
अनिल कुंभारे : परिमंडळ 8 
परमजित दहिया : परिमंडळ 9 
वीरेंद्र मिश्र : मुख्यालय 1 
आनंद मंडया : सशस्त्र दल विभाग 
डॉ. विनयकुमार राठोड : परिमंडळ 12 
राजेश दाभाडे : अंमलबजावणी 
अशोक दुधे : वाहतूक (शहरे) 
प्रदीप सावंत : सुरक्षा 
दिलीप सावंत : गुन्हे प्रकटीकरण 
डॉ. सौरभ त्रिपाठी : वाहतूक मुख्यालय/पूर्व उपनगरे 
संजय ऐनपुरे : विशेष शाखा 1 
डॉ. रश्‍मी करंदीकर : अभियान/प्रवक्ता 
दीपक देवराज : महिला अत्याचारविरोधी कक्ष 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख