वन विभागाला साथ देत पोलिसांनी विझवला चौराई डोंगरावरचा वणवा; महिला अधिकाऱ्यांचे कौतुक

तळेगाव पोलिसांनी रात्रीच्या किर्र अंधारात डोंगरावीर घनदाट जंगलात जाऊन वन विभागाच्या अधिकाऱ्याला साथ देत तळेगाव दाभाडे लगतच्या चौराई डोंगरावर लागलेला वणवा विझवला. महिला वनरक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
Police and Forest Officers Doused Fire at Talegaon
Police and Forest Officers Doused Fire at Talegaon

तळेगाव स्टेशन : तळेगाव पोलिसांनी रात्रीच्या किर्र अंधारात डोंगरावीर घनदाट जंगलात जाऊन वन विभागाच्या अधिकाऱ्याला साथ देत तळेगाव दाभाडे लगतच्या चौराई डोंगरावर लागलेला वणवा विझवला. महिला वनरक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तळेगाव दाभाडे आणि परंदवाडी हद्दीतील डोंगरावरील जंगलात दुपारी चार अज्ञात इसमांनी प्रजासत्ताक दिनाच्या दुपारी जाणीवपूर्वक लावलेला वणवा रात्रीपर्यंत धुमसत वाढत चालला होता .वनरक्षक रेखा संभाजी परदेशी या दुपारपासून वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र मनुष्यबळाअभावी त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. सायंकाळनंतर अंधारात आग दिसू लागलयाने वणवा उग्र रूप धारण करुन वाढत असल्याचे तळेगावच्या नागरिकांसह,डोंगरालगत असलेल्या तळेगाव दाभाडे ठाण्यातील पोलिसांच्या लक्षात आले. 

पोलिस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे आणि बीट मार्शलचे प्रशांत सोनवणे यांनी तळेगाव बाजूने वणण्याची तीव्रता जाणली. तळेगावातील बहुतांश निसर्गमित्र कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने मतद मिळेना झाली.वनरक्षक वाघमारे यांनी तळेगाव दाभाडे आणि परंदवाडी पोलिस ठाण्यात वणवा लावणार्या अज्ञाताबद्दल माहीती देऊन फिर्याद नोंदवण्याची विनंती केली. अखेर रात्री साडेआठनंतर वाढत्या आगीचे स्वरुप पाहता सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंदा गावडे यांनी निर्णय घेतला. 

आपल्या ठराविक कर्मचार्यांसह,परंदवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि गांवकरी यांच्यासह धोका पत्करून दृतगती महामार्गाच्या बाजूने रात्रीच्या अंधारात घनदाट जंगलातून वाट काढत डोंगर चढायला सुरुवात केली. झाडाच्या फांद्या आणि मातीने सर्वांनी मिळून जवळपास एकरभर जागेवर ठिकठिकाणी लागलेली आग तासाभरात विझवली. रात्री दहाच्या सुमारास आग विझल्याची माहीती धास्तावलेल्या नागरिकांना कळवताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. जवळपास आठ तासातील या वणव्यामुळे चौराई डोंगरावरील दहा एकरपेक्षा अधिक वनक्षेत्र जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नियंत्रणाबाहेर चाललेला वणवा विझवला नसता तर रात्रीतून कदाचित वन्यजीव आणि वनसंपत्तीची आणखी मोठी हानी होण्याचा धोका यामुळे टळला. कायदा सुव्यवस्था आणि नागरी सुरक्षाव्यवस्था राखण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी वनखात्याला ऐनवेळी दिलेल्या मदतीमुळे संभाव्य मोठी नैसर्गिक हानी वाचली. स.पो.नि.कुंदा गावडे,उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे, परंदवाडी पोलिस चौकीचे कर्मचारी आणि वनरक्षक रेखा वाघमारे यांच्यासह बारा जणांच्या या धैर्याचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com