Police officers are not getting private veichles on rent | Sarkarnama

निवडणुकीसाठी पोलिसांना भाड्याची वाहने मिळेनात , गेल्या वेळेसचे भाडे अजून थकीत !

सरकारनामा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नवी मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या काही खासगी वाहनांचे भाडे नवी मुंबई पोलिसांकडून अद्यापपर्यंत वाहतूकदारांना देण्यात आले नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पोलिसांना वाहने देण्यास वाहतूकदार नाखुश असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या काही खासगी वाहनांचे भाडे नवी मुंबई पोलिसांकडून अद्यापपर्यंत वाहतूकदारांना देण्यात आले नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पोलिसांना वाहने देण्यास वाहतूकदार नाखुश असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई पोलिसांकडे वाहनांची संख्या मर्यादित असल्याने निवडणुकीच्या काळात त्यांना खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेऊन निवडणुकीशी संबंधित बंदोबस्त व इतर कामे करावी लागतात. लोकसभा निवडणुकीवेळी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील त्या-त्या पोलिस ठाण्यांनी त्यांच्या गरजेनुसार 4 ते 5 वाहने भाडेतत्त्वावर घेतली होती. 

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आपल्या वाहनांचे भाडे पोलिसांकडून मिळेल, अशी अपेक्षा या खासगी वाहने पुरवणाऱ्या व्यावसायिकांना होती; मात्र लोकसभा निवडणुका संपून राज्यातील विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरू झाल्यानंतरदेखील काही वाहतूकदारांना वाहनांचे भाडे पोलिसांकडून अद्याप मिळालेले नाही. 

सोमवारी  राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान होत असल्याने पोलिसांना खासगी वाहनांची आवश्‍यकता भासणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याकडून खासगी वाहने पुरविणाऱ्या ट्रान्स्पोर्ट चालकांकडे वाहनांची मागणी करण्यात येत आहे; मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात पुरविण्यात आलेल्या वाहनांचे पैसे न मिळाल्याने पोलिसांना पुन्हा वाहने देण्यासाठी ट्रान्स्पोर्ट चालक इच्छुक नसल्याचे एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या खासगी वाहनांची वाहतूकदारांनी सादर केलेल्या काही बिलांमध्ये शासनाच्या कोषागार विभागाने त्रुटी काढल्याने त्या वाहतूकदारांना भाडे मिळालेले नाही. त्या वाहतूकदारांनी पुन्हा दुरुस्ती करून दिलेली बिले कोषागार विभागाला पाठविलेली आहेत. तसेच या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाडेतत्त्वावर आवश्‍यक असलेली वाहने घेण्यात आली आहेत.
- शिवराज पाटील, पोलिस उपायुक्त

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख