व्हाटस अप ग्रुप admin धास्तावले : पोलिसांच्या नोटिसमुळे ग्रुप झाले शांत - police notice to what`s app group admin | Politics Marathi News - Sarkarnama

व्हाटस अप ग्रुप admin धास्तावले : पोलिसांच्या नोटिसमुळे ग्रुप झाले शांत

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पोलिसांनी दिली होती तंबी....

बुलडाणा : सध्याचे वातावरण आणि अयोध्या निकाल पाहता सोशल मिडीयावरील व्हॉट्सअ‍ॅप्स आणि फेसबुक पेज अ‍ॅडमिनने त्यांचे ग्रुपवर निर्बंध आणत ब्लॉक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. काल संध्याकाळपासूनच ग्रुप अॅडमिनने काळजी घेण्यास सुरवात केली होती.

सोशल मिडीयाचा देशभरात असलेले जाळे पाहता  महत्त्वपूर्ण अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी सुरक्षेतेसोबत सोशल मिडीयावर काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती तसेच नोटीसही देण्यात येत आहे.

यामुळे सोशल मिडीयावरील महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप्स गु्रप तसेच फेसबुक पेजच्या अ‍ॅडमिनने सर्वांसाठी मेसेज टाकण्याची मुभा आता ब्लॉक केली आहे. यामुळे आलेला मेसेज ब्लॉक असलेल्या ग्रुपवर शेअर करण्याला आता पायबंद झाला आहे. पोलिसांनी यापूर्वीच विविध व्हॉट्सअ‍ॅप्स गु्रपच्या अ‍ॅडमिनला नोटीस देऊन आक्षेपार्ह चित्र, व्हीडीओ किंवा इतर मजकूर इतरत्र गु्रपवर प्रसारित केल्या जाणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या नोटीस दिल्या आहेत.

दरम्यान, काल संध्याकाळपासून केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच मेसेज टाकण्याची मुभा अवलंबित इतरांना ती ब्लॉक करण्याची मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत सोशल मिडीयावरील हा बहुधा पहिला प्रयोग असावा असे यातील तज्ज्ञ मत व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात कोणीही कुठलाही मजकूर टाकू नये अशा सूचना आणि त्यांचे नियमही सातत्याने शेअरींग करण्यात येत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख