Police in Nashik Enjoying Trips with Family's | Sarkarnama

आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलांच्या पुढाकाराने पोलिस कुटुंबीय रमले सहलींत!

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 5 जून 2019

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलिस कर्मचारी व कुटुंबिय प्रथमच पर्यटन रजेचा आनंद घेत आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत पोलीस कर्मचारी कुटुंबासह सहलीला जात आहेत.

नाशिक : पोलिस कर्मचारी म्हणजे सातत्याने व अपवाद वगळता रजेशिवाय सतत कर्तव्य बजावण्यासाठी हजर असलेला घटक. अगदी सणासुदीला रजा नसतेच. मात्र उलट जास्त बंदोबस्त असल्याने त्यांना क्वचितच कुटुंबासमवेत वेळ घालवता येतो. मात्र, त्यांनाही सहकुटुंब सहलीसाठी आठवडाभर रजा मिळते हे पहिल्यांदाच कळले. त्यामुळे नाशिकच्या पोलिसांच्या सध्या सहकुटुंब सहली चांगल्याच आनंदात होत आहेत. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अशी रजा असते, हे पोलिस प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने हे शक्‍य झाल्याने सध्या खुश असलेले पोलिस त्यांचे आभार व्यक्त करतांना दिसतात. 

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलिस कर्मचारी व कुटुंबिय प्रथमच पर्यटन रजेचा आनंद घेत आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत पोलीस कर्मचारी कुटुंबासह सहलीला जात आहेत. पोलीस कर्मचारी म्हटले की, बारा तास फक्त काम एके काम. न कसली उसंत. असे चित्र नेहमी पहावयास मिळत असते. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांना चार वर्षातून एकदा सात दिवसीय पर्यटन रजा असते. परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांना हे माहितीदेखील नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक शहर आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्यांना शासकीय अनुदानातून तीन दिवसीय सहलीचे आयोजन केले आहे. 

या सहलीत कोल्हापूर, ज्योतिबा, गणपतीपुळे आणि महाबळेश्वर या ठिकाणी जाण्याचे नियोजन आहे. सोमवारी रात्री पोलिस उपायुक्त (प्रशासन) माधुरी कांगणे, पोलिस निरीक्षक मनोज करंजे, महिला पोलिस निरीक्षक संगीता निकम यांनी पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. पर्यटन रजेचा आनंद पंचवटी, मुंबई नाका, सरकारवाडा पोलीस ठाणे, गुन्हे शाखा व पोलीस मुख्यालय असे एकूण पंचवीस कर्मचारी कुटुंबासह घेत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना पर्यटन रजा ही चार वर्षातून एकदा मिळते. बरेचचा त्याला कुटुंबातील लोकांनी देखील वेळ देता येत नाही. यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पर्यटन रजेचा उपभोग घेण्यासाठी या सहलीचे पोलिस कर्मचारी व कुटुंब असे आयोजन केले. यामुळे पोलिस कर्मचारी यांच्यात आनंदाने वातावरण असून कुटुंबिय आयुक्तांचे आभारदेखील मानत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख