Police Naik Kills his two Step Sons | Sarkarnama

पोलिसाने केले थंड डोक्याने सावत्र पुत्रांना गोळ्या झाडून ठार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 जून 2019

येथील पोलिस नाईक संजय भोये यांनी विवाह केलेल्या पत्नीच्या मुलांचा अठरा वर्षे पुत्रवत सांभाळ केला. त्यांना आपले नाव दिले. हीच मुले मोठी झाल्यावर आईच्या नावावर असलेला राहता फ्लॅट मागू लागले. त्यावरुन भांडण करु लागले. हे भांडण एव्हढ्‌या टोकाला गेले की, संजय भोयेने "थांबा आपण हा वाद कायमचा संपवून टाकू'' असे म्हणत शांतपणे सर्व्हीस रिल्व्हॉवरमध्ये गोळ्या लोड करीत दोन्ही मुलांना गोळ्या घालून ठार केले.

नाशिक : येथील पोलिस नाईक संजय भोये यांनी विवाह केलेल्या पत्नीच्या मुलांचा अठरा वर्षे पुत्रवत सांभाळ केला. त्यांना आपले नाव दिले. हीच मुले मोठी झाल्यावर आईच्या नावावर असलेला राहता फ्लॅट मागू लागले. त्यावरुन भांडण करु लागले. हे भांडण एव्हढ्‌या टोकाला गेले की, संजय भोयेने "थांबा आपण हा वाद कायमचा संपवून टाकू'' असे म्हणत शांतपणे सर्व्हीस रिल्व्हॉवरमध्ये गोळ्या लोड करीत दोन्ही मुलांना गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या पोलिस दलातील या सर्वात भयावह घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे.

मनीषा भोये पहिले पती नंदकिशोर चिखलकर वेगळ्या झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस सेवेत असलेल्या संजय भोये यांनी त्यांच्याशी विवाह केला. त्यांच्या पहिल्या पतीची दोन्ही मुले शुभम आणि अभिषेक यांचाही त्यांनी सांभाळ केला. त्यांचे शिक्षण, नोकरी यांपासून तर सर्व काळजी घेतली. अगदी महिन्यापूर्वी मोठा मुलगा शुभम याचा कळवण येथील निकीताशी विवाह करुन दिला. तेव्हात्यांनी त्याला स्वतःचे नावही दिले. या दरम्यान त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. मात्र कुटुंबात ते सगळेच सख्खे बहिण भाऊ असेच वावरत होते. या सुरळीत चालणाऱ्या संसारात अचानक मोठा मुलाला वाईट संगत लागल्याने दारुचे व्यसन लागले.

या व्यसनापासून त्याला दुर करण्यासाठीच भोये यांनी त्याला सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत नोकरी मिळवून दिली. सुधारण्यासाठी विवाह करुन दिला. मात्र अचानक ही दोन्ही मुले पत्नीच्या नावे असलेला सध्याचा राहता फ्लॅट आम्हाला द्या असा हट्ट धरु लागली. या मागणीने त्यांच्या घरातील सौख्य व संवाद दोन्हींची जाग वादाने घेतली. गेले काही दिवस हा वाद सुरु होता.

भोये उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे शोधपथकात (डीबी) कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी तीन-सव्वातीनच्या सुमारास घडली. फ्लॅटच्या वादामुळे रात्रपाळी करुन घरी आलेले संजय भोये यांचे संतुलन बिघडले. त्यांनी "थांबा हा वाद कायमचा मिटवतो.'' असे म्हणत शांतपणे सर्व्हिस रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या लोड केल्या अन्‌ वीस वर्षे पुत्रवत सांभाळ करीत जीव लावलेल्या शुभम (वय 25) आणि अभिषेक (वय 22) यांना ठार केले. वीस वर्षे बहरलेला पिता आणि पुत्रांतील प्रेमाचा वृक्ष त्या तीन गोळ्यांनी उन्मळून पडला. नाशिकच्या पोलिस दलात सर्व्हीस रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून हत्येची ही अलिकडच्या काळातील ही सर्वात भयावह व धक्काधायक घटना होय. याआधी वीस
वर्षांपूर्वी सिडकोत एका पोलिसाने चारीत्र्याच्या संशयावरुन रात्रपाळी करुन पहाटे घरी गेल्यावर आपली पत्नी व तान्ह्या मुलाला सर्व्हीस रायफलमधून गोळ्या झाडून ठार केले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

यानिमित्ताने एखाद्या कुटुंबातील आपुलकी, जिव्हाळा आणि कौटुंबिक वाद हे किती टोकाला जाऊ शकतात हे पहायला मिळाले. मनुष्याला अशा या तणावातून टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडते, याचा प्रत्यय शुक्रवारी (ता. 21) नाशिकमध्ये आला. पंचवटीतील पेठ रोडवरील घरगुती वादातून पित्याने केलेल्या गोळीबारात दोन सावत्र मुलांचा मृत्यू झाला. यात सोनू ऊर्फ अभिषेक हा मर्चंट नेव्हीत नोकरी करीत होता. तो सुटीवर आला होता. आज तो परत जाणार होता. त्याएैवजी त्याला मृत्यू मिळाला. शुभमचे महिन्याआधी लग्न झाले होते. त्याला मृत्यूने गाठले तर त्याची पत्नी निकीताला अकाली वैधव्य प्राप्त झाले. पोलिस नाईक संजय अंबादास भोये यांची पत्नी उषा व त्यांची अन्य दोन्ही अपत्ये यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेनंतर भोये स्वतः पंचवटी पोलिसांत हजर झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्या बंदुकीने कायद्याचे रक्षण करायचे त्याच बंदुकीने त्यांनी माझ्या दोन लेकरांचा बळी घेतला. काय म्हणावे या बापाला. मी विमनस्क झाले आहे.- मनीषा भोये

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख