`महाजनादेश`मध्ये `एकच वादा अजितदादा` घोषणा देणाऱ्यांवर गुन्हा

`महाजनादेश`मध्ये `एकच वादा अजितदादा` घोषणा देणाऱ्यांवर गुन्हा

बारामती शहर : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान `एकच वादा अजितदादा` अशा घोषणा देणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा बारामतीत आली होती, त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमर धुमाळ, सागर खलाटे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा या सह मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील घोषणा देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा आशयाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंडविधानाच्या कलम 143,145,149,188 सह महाराष्ट पोलीस कायदा 1951 चे कलम 37 (1) व (3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी ओंकार सिताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारामतीत आपल्या यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. तसेच बारामतीत कलम 370 लागू केले आहे का, असा सवाल उपस्थित करत शरद पवारांच्या सभेत आम्ही अडथळे आणले तर चालतील का, असा प्रतिप्रश्न केला होता. त्यानंतर ही कारवाई झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com