Police Detained Shetkari Sanghatna Workers in Nashik | Sarkarnama

देवेंद्र फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेमुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांची पोलिसांकडून मध्यरात्री धरपकड

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आज शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रोड शो होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी आंदोलनाचा पोलिसांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी मध्यरात्री शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. या सर्वांना शहराबाहेर देवळाली कॅम्पला ठेवले. 

नाशिक  : आज शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रोड शो होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी आंदोलनाचा पोलिसांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे पोलिसांनी मध्यरात्री शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. या सर्वांना शहराबाहेर देवळाली कॅम्पला ठेवले. 

आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री यांचा रोड शो आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.  या सभेआधी कांदा व अन्य आंदोलनाचा चांगलाच धसका घेतला आहे. मध्यरात्री पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांच्या घरून त्यांना ताब्यात घेतले. कांदा आयात करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात तीव्र संताप आहे. हा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्‍चितपणे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना विचारेल, याचा धसका घेऊन आज पहाटे स्वाभिमानीचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले पाटील  यांच्यासह नाशिक तालुक्याचे अध्यक्ष रतन मटाले पाटील जिल्ह्यातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या पूर्वीही हंसराज वडघुले यांनी तपोवणात पंतप्रधान यांच्या सभेत कांद्यावर आवाज उठवला होता.त्या मुळेच प्रशासन हादरलेले दिसते. 

शेतकऱ्यांचे  प्रश्न मिटवणे ऐवजी विरोधकांनाच मिटवणे असे कट कारस्थान  सुरू आहे.अशीच शेतकऱ्यांची मुस्कटदाबी सुरू राहिली तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका होईल. सरकार शेतक-यांना का घाबरते?.
- संदीप जगताप, राज्य प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख