बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड (व्हिडिओ)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान आंदोलनाचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड चालू केली आहे.
Police Detained NCP Workers in Baramati Ahead of CM's Vistit
Police Detained NCP Workers in Baramati Ahead of CM's Vistit

बारामती शहर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान आंदोलनाचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड चालू केली आहे.

बारामती शहरात एमआयडीसी परिसरात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे यांच्यासह दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले याची प्राथमिक माहिती मिळाली आहे .

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान कोणतीही गडबड होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे. या कार्यकर्त्यांना बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com