औरंगाबाद पोलिस आयुक्तांच्या हातावर घड्याळ कोण बांधणार ...!

विशेषत: पोलिस आयुक्तालयाचाच कार्यक्रम असल्याने सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारीही वेळेपूर्वीच हजर झाले. पण नेहमीप्रमाणे पोलिस आयुक्तच कार्यक्रमस्थळी पोचले नाही. त्यामुळे सर्वचजण ताटकळले. नागरिकांना व पुढाऱ्यांना आयुक्तांच्या विलंबाचा मोठा फटका बसला.
औरंगाबाद पोलिस आयुक्तांच्या हातावर घड्याळ कोण बांधणार ...!

औरंगाबाद : कार्यक्रमांना नेहमीच उशिरा येणाऱ्या पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी रमजान ईदनिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीलाही तासभर उशीर केला. यामुळे कार्यक्रम विलंबाने सुरू झालाच परंतु, तासभर सुमारे बाराशे नागरिकांना ताटकळत बसावे लागले. एवढेच नव्हे तर आमदार, महापौरांसह माजी खासदारांनाही आयुक्तांच्या लेटलतिफपणाचा हा दुसऱ्यांदा फटका बसला. 

पोलिस आयुक्तालयाचा एखादा कार्यक्रम असला की, या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त दर्जापेक्षा खालचे अधिकारी वेळेवर हजर राहतात. प्रमुख पाहुणे व अन्य पाहुणेही वेळेपूर्वीच उपस्थिती लावतात.

परंतु पोलिस आयुक्त तास-दीडतास उशिरा येणार आता हे समीकरणच झाले आहे. 31 मे रोजी बेगमपूरा पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्‌घाटनावेळीही विलंबाचा फटका आमदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाठ, माजी खासदार प्रदीप जैस्वाल व महापौर भगवान घडामोडे यांना बसला होता. पोलिस आयुक्तांसाठी बराच वेळ थांबूनही त्रस्त झालेल्या आमदार इम्तियाज जलील व संजय शिरसाठ यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता.

यानंतर उशीराने आलेल्या आयुक्तांनी कार्यक्रम उरकता घेतला. असाच प्रकार सात दिवसांतच पाहायला मिळाला. रमजान व ईदनिमित्त शांतता व सलोखा बैठक सोमवारी (ता. सहा) सकाळी अकरा वाजता तापडिया नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला महापौर भगवान घडामोडे आमदार इम्तियाज जलील, माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना बोलावण्यात आले. वेळ अकराची असल्याने पुढारी व नागरिक वेळेवर तर काही वेळेपूर्वीच उपस्थित झाले.

विशेषत: पोलिस आयुक्तालयाचाच कार्यक्रम असल्याने सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारीही वेळेपूर्वीच हजर झाले. पण नेहमीप्रमाणे पोलिस आयुक्तच कार्यक्रमस्थळी पोचले नाही. त्यामुळे सर्वचजण ताटकळले. नागरिकांना व पुढाऱ्यांना आयुक्तांच्या विलंबाचा मोठा फटका बसला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com