police colony | Sarkarnama

पोलिसांसाठी 35 हजार घरे बांधणार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मे 2017

सातारा पोलिस दलाचे काम उत्कृष्ट असल्याचे सांगून गृह राज्यमंत्री श्री. केसरकर म्हणाले, निर्भया पथक, सर्व दक्ष अभियानातून जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. पोलिसांसाठी सुसज्ज असे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या परिसरात विश्रामगृह उभारण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले. 
 

सातारा : पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यात 35 हजार नवीन घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या परिसरात विश्रामगृह उभारण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

पाटण पोलिस ठाण्यांतर्गत नवीन शासकीय पोलिस वसाहतीच्या इमारतीचे भूमीपूजन राज्यमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार शंभुराज देसाई, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, नगराध्यक्ष सुषमा महाजन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, अधीक्षक अभियंता संभाजी माने, अशोक पाटील, विजयसिंह पाटील, निर्मला देसाई, जयवंत शेलार उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख