सोलापुरातील मंत्र्यांच्या घरी पोलिस संरक्षण

सोलापूर शहर पोलिसांनी शहरात असलेले सहकारमंत्री देशमुख, पालकमंत्री देशमुख, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासह संपर्क कार्यालयावर बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींच्याही घरी बंदोबस्त ठेवला आहे.
सोलापुरातील मंत्र्यांच्या घरी पोलिस संरक्षण

सोलापूर - राज्यात शेतकरी संपाचा आज सातवा दिवस आहे. दिवसेंदिवस संप तीव्र होत चालला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकाश घडू नये म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या घरी पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, मालाला हमीभाव मिळावा, वीजबिल रद्द करावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या सात दिवसापासून हा संप सुरू आहे. संपाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. सोलापूर शहर पोलिसांनी शहरात असलेले सहकारमंत्री देशमुख, पालकमंत्री देशमुख, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासह संपर्क कार्यालयावर बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींच्याही घरी बंदोबस्त ठेवला आहे.

आमदार सोपल यांनी स्वतः लावले कुलूप
शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाला आमदार दिलीप सोपल यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी स्वतः आपल्या कार्यालयाला कुलूप लावून संपाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com