भिडेंना वाचवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून दबाव असल्याचे पुरावे देऊ : प्रकाश आंबेडकर - PMO Behind Sambhaji Bhide Says Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

भिडेंना वाचवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून दबाव असल्याचे पुरावे देऊ : प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोरेगाव भीमा येथील दंगलीतील आरोपी संभाजी भिडे यांना वाचविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून दबाव येत आहे. या प्रकरणाचा योग्य तपास न झाल्यास भिडे व पंतप्रधान कार्यालयाचे 'कनेक्‍शन' पुराव्यासह सादर करू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला.

नगर : कोरेगाव भीमा येथील दंगलीतील आरोपी संभाजी भिडे यांना वाचविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून दबाव येत आहे. या प्रकरणाचा योग्य तपास न झाल्यास भिडे व पंतप्रधान कार्यालयाचे 'कनेक्‍शन' पुराव्यासह सादर करू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला.

शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "देशातील काही अनियंत्रित संघटनांनी सुरवातीला मुस्लिम, नंतर ख्रिश्‍चन समाजास त्रास दिला. त्या वेळी कोणीही उघड बोलले नाही. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर आपण व्यक्त व्हायला लागलो. काही दिवसांपूर्वी गुडगावला स्कूल बसवर दगडफेक झाली. अनियंत्रित संघटनांचे भांडण मध्यमवर्गीय हिंदूंच्या घरापर्यंत पोचले आहे. या कट्टरतावादी संघटना न्यायालयाला नव्हे, तर स्वत:च्या निर्णयाला महत्त्व देतात.''

'"कोरेगाव भीमा प्रकरणानंतर महाराष्ट्रात 'बंद' पाळण्यात आला. नंतर पोलिसांनी 'कोम्बिंग ऑपरेशन' राबविले. मुख्यमंत्र्यांनी करणी सेनेवरही असेच ऑपरेशन राबवावे. सनदशीर मार्गाने चालणाऱ्यांवर दडपशाही, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्यांविरुद्ध साधी फिर्यादही नाही. कोरेगाव भीमा प्रकरणावर मुख्यमंत्री उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींशी चर्चा करून पावले उचलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अजून काहीच झाले नाही. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नाही,'' असे ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार भाजप विरोधकांची मोट बांधत असल्याचे विचारले असता, आंबेडकर म्हणाले, "विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपची साथ सोडत होती. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हात दिला. राष्ट्रीय राजकारणात चारित्र्याची गरज असते.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख