गॅस शवदाहिनी खरेदी प्रकरणी कारवाईबाबत प्रशासनाकडून चालढकल

पर्यावरणपूक गॅस शवदाहिनी खरेदी प्रकरणात आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. आयुक्तांनी या प्रकरणाचा अहवाल वाचण्यासाठी आठवडाभराची मुदत मागितली आहे. त्यानुसार त्यांना ही मुदत दिली आहे. स्थायी समितीच्या पुढील सभेत हा विषय मार्गी लावला जाईल. - सीमा सावळे, अध्यक्षा, स्थायी समिती.
गॅस शवदाहिनी खरेदी प्रकरणी कारवाईबाबत प्रशासनाकडून चालढकल

पिंपरी - सांगवी येथील पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी खरेदी प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. त्याबाबत स्थायी समितीकडून देखील लेचीपेची भूमिका घेतली जात आहे. आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर यांनी संबंधित प्रकरणाचा अहवाल वाचण्यासाठी आठवडाभराची मुदत मागुन घेतली आहे. ही मुदतवाढ बुधवारी स्थायी समिती सभेत देण्यात आली.

पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी खरेदी प्रकरणी महापालिकेत सत्तेत नसताना भाजपने मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. तसेच चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. पिंपरी महापालिकेत सत्तांतर होऊन तीन महिन्यापूर्वी भाजप सत्तेत आले. भाजप सत्तेत आल्याने आता भाजप पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेल्या प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष लागेल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. मात्र, अद्याप एकाही प्रकरणातील दोषींवर कारवाई झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे सत्ताधारी झाल्यावर भाजपच्या भूमिकेत बदल झाला आहे का, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना निलंबित करण्याचे आदेश स्थायी समिती सभेत यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत कारवाई झालेली नाही. पंधरा दिवसांपूर्वीच आयुक्त हर्डीकर यांनी गॅस शवदाहिनीच्या अहवालानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही याबाबत काहीही हालचाल झालेली दिसत नाही.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com