PMC election 2017 | Sarkarnama

खासदार काकडे यांचे अंदाज परफेक्‍ट 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

भाजपचे खासदार संजय काकडे यांनी पुणे महापालिकेतीलन निकालाविषयी व्यक्त केलेले अंदाज एकदम बरोबर आले आहेत. पुण्यातील "वाडेश्‍वर कट्टा' नावाने काही मंडळी नियमित भेटत असतात.

पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे यांनी पुणे महापालिकेतीलन निकालाविषयी व्यक्त केलेले अंदाज एकदम बरोबर आले आहेत. पुण्यातील "वाडेश्‍वर कट्टा' नावाने काही मंडळी नियमित भेटत असतात. या कट्ट्यावर सर्वपक्षीय नेते आणि पत्रकारांना बोलविण्यात आले होते. तेथे निकालाची स्पर्धा घेण्यात आली.

प्रत्येकाने आपले अंदाज चिठ्ठीवर लिहून ठेवायचे आणि निकालानंतर ही चिठ्ठी उघडायची असे ठरविण्यात आले होते. या स्पर्धेत खासदार संजय काकडे देखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांच्या चिठ्ठीतील अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास आले आहेत. त्यांनी भाजपला 92 जागा मिळतील, असे लिहून ठेवले होते. प्रत्यक्षात भाजपला 98 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला 42, कॉंग्रेसला 12, शिवसेना दहा, मनसे 3 आणि इतर तीन असा अंदाज त्यांनी या चिठ्ठीत वर्तविला होता.

प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादीला 38, शिवसेनेला 10, कॉंग्रेसला 8, मनसेला 2 आणि इतर पाच अशा जागा आहेत. संजय काकडे यांनी सेफॉलॉजिस्टपेक्षा जास्त निर्दोष अंदाज व्यक्त केले. भाजपला पुण्यात 92 जागा मिळतील, असे कोणालाही वाटले नव्हते. त्याच वेळी 92 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणाही त्यांनी या कट्ट्यावर केली होती. अंदाज खरे ठरल्याने तसे करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख