पुण्यातील पेठांचा भाग सील करणार : 37 कोरोना रुग्ण आढळल्याने निर्णय़

पुण्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महापालिका आता कठोर निर्णय घेणार आहे.
corona 11
corona 11

पुणे : पुण्यातील जुन्या पेठांमध्ये कोरोनाचे 37 रुग्ण सापडल्याने हा भाग सील करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. तसेच कोंढवा भागातही अशीच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आकडा वाढण्याला अटकाव करण्यासाठी सीलिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड आहे. कोणता भाग सील झाला आहे, याचा निश्चित नकाशा पुणे पोलिसांकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे.

एकाच भागातील व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय़ घेण्यात आला आहे. 

गुलटेकडी ते आरटीओ दरम्यानचा हा सगळा भाग असणार आहे. यानुसार नागरिकांना शंभर टक्के मास्क लावण्याचे बंधन असणार आहे. याशिवाय त्यांनी बाहेर पडायचे नाही. या क्षेत्रातून कोणालाही प्रवास करता येणार नाही. या सील केलेल्या भागात कोणालाही घराबाहेर विनाकारण पडता येणार नाही. कोणाला हा भाग ओलांडून पलीकडे जायचे असेल तरी त्याला या भागात येण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. गुलटेकडी मार्केटयार्डचा भाग या सीलिंगमध्ये येणार असला तरी येथील भाजीपाला बाजार सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात 100 कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत. तेथील क्षमता संपल्याने आता औंध येथील रुग्णालयात नव्या रुग्णांना हलविण्यात येणार आहे. रुग्णांची संख्या कितीही अगदी 25  हजारापर्यंत वाढली तरी पुणे महापालिकेची त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र हा आकडा वाढू द्यायचा नसेल निर्बंध घालण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. मरकझमध्ये गेलेले 30 कोरोनाचे रुग्ण पुण्यात दाखल आहे. पुण्यात आतापर्यंत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 781 झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com