pmc bank corruption raj thackrey attack bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
बारामती : बारामतीत अजित पवार आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

भाजपमुळेच पीएमसी बॅंकेचा घोटाळा, राज ठाकरेंचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणे : भाजपमुळेच पीएमसी बॅंकेत घोटाळा झाला आहे. या बॅंकेवर कोण आहेत ? भाजपचीच माणसं आहेत असा हल्लोबोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले.तरूणांना रोजगार देणार होता त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी भाजप सरकारला केला. 

पुणे : भाजपमुळेच पीएमसी बॅंकेत घोटाळा झाला आहे. या बॅंकेवर कोण आहेत ? भाजपचीच माणसं आहेत असा हल्लोबोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले.तरूणांना रोजगार देणार होता त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी भाजप सरकारला केला. 

विधानसभेसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ सांताक्रुझ येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज यांनी चौफेर टोलेबाजी केली. प्रारंभी पुण्यातील पावसाचा अनुभव कथन करताना म्हणाले, की मी कोणाशी बोलतो, माझ्याशी कोण बोलतो हेच कळत नाही. ईडी चौकशीनंतर राज यांची आज मुंबईत ही सभा असल्याने राज्याचे याकडे लक्ष लागले होते. पुण्यात अर्धातास पाऊस पडून शहर उध्वस्त होत असेल तर करायचं काय ? यापुढे तर कोणी विचारले ना की कुठे राहता तर पुण्यात नव्हे तर पाण्यात राहता असे सांगा असा संतप्त सवालही त्यांनी केला. 

गेल्या पाच दहा वर्षात अनेक घटना घडत आहेत. कॉंग्रेसचे विरोधीपक्षनेतेच जर भाजपत जाणार असेल तर तुमचे प्रश्‍न मांडणार कोण ? तुमची खदखद मांडणार कोण ? सत्ताधारी पक्षातील आमदारांना तर ब्र काढता येत नाही. मला समाधानी माणूस कोण हे सांगा ? बॅंका बुडता आहेत ? लोक रडता आहेत? तुमचे हक्काचे पैसे काढता येत नाही. पीएसबी बॅंकेवर कोण भाजपची माणसं! शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी ओरडतो आहे. नुसत्या घोषणा द्यायच्या आणि जायचे. या देशातील न्यायालयाकडून तरी न्याय मिळणार आहे की नाही ? तुमचा आवाज आणि राग कोण व्यक्त करणार ? असा सवालही त्यांनी केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख