pm-on-opponent | Sarkarnama

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एका आमदाराने साऱ्या विरोधकांची झोप उडवली : मोदी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जानेवारी 2019

देशातील सारे विरोधक पश्चिम बंगालमध्ये `बचाब बचाव' घोषणा देऊ लागले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

पुणे : देशातील सारे विरोधक पश्चिम बंगालमध्ये `बचाब बचाव' घोषणा देऊ लागले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

सिलव्हासा येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी ही टीका विरोधकांवर केली. 

मोदी टीका करताना म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये भाजपचा केवळ एक आमदार आहे. परंतु तेथे भाजपपासून वाचण्यासाठी देशातील सारे विरोधक एकत्र आले आहेत. सर्व विरोधक `बचाव बचाव' करीत आहेत. एका आमदाराने चुकीचे काम करणाऱ्यांची झोप उडवली आहे. भीतीमुळे सारे एकत्र झाले आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख