पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात काढला पोलिस अधिकाऱ्यांचा घाम!

...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात काढला पोलिस अधिकाऱ्यांचा घाम!

पुणे : पंचतारांकित हॉटेल नाही. शुद्ध शाकाहारी जेवण, भल्या पहाटे उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत योगासने आणि दिवसभर देशाच्या सुरक्षेवर चिंतन. अशा व्यस्ततेत तीन दिवसांची पोलीस महासंचालक परिषद (डीजी कॉन्फरन्स) आज पुण्यात संपली. सलग दोन दिवस स्वत: पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती हे या परिषदेचे वैशिष्टय ठरले. सकाळी नऊ ते रात्री साडेअकरा पर्यंत चालणारी परिषद पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची अखंड उपस्थिती व देशाच्या सुरक्षेची काळजी वाहणारे सर्वोच्च 185 आधिकारी सलग तीन दिवस पुण्यात होते.

दरवर्षी होणारी पोलीस महासंचालक यावर्षी पुण्यात झाली. या परिषदे दरम्यान दोन रात्री व दोन दिवस पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा पुण्यात मुक्कामाला होते. पुण्यात राजभवनात त्यांनी मुक्काम होता. गुप्तचर विभाग (आयबी), रिसर्च ऍण्ड ऍनिलिसिस विंग (रॉ) तसेच राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आणि सर्वोच्च असलेल्या संस्थांचे प्रमुख, सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक या परिषदेला उपस्थित होते.

या सर्वांच्या मुक्कामाची व्यवस्था आयसर व यशदाच्या विश्रामगृहात करण्यात आली होती. या परिषदेसाठी पुणे पोलीस, राज्य गुन्हे अन्वेषण विभागासह सर्वच आधिकारी परिषदेच्या आयोजनात आघाडीवर होते. "आयसर'च्या आवारात झालेल्या या परिषदेच्या निमित्ताने या साऱ्या परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था होती. दोन दिवसांच्या वास्तव्यात पंतप्रधान मोदी यांनी परिषदेच्या ठिकाणी असलेले जेवण घेतले. सकाळचा चहा,नाश्‍ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण त्यांनी सर्व आधिकाऱ्यांसोबतच घेतले. परिषदेच्या संपूर्ण काळात फक्त शाकाहारी जेवणाची व्यवस्था होती. जास्तीत जास्त वेळ आधिकाऱ्यांसोबत घालवला. शुक्रवारी रात्री मुक्कामाला पुण्यात आल्यानंतर गृहमंत्री व सर्व आधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी आयसरच्या बॅडमिंटन हॉलमध्ये योगासने केली. रविवारी योगासनासाठी ते येऊ शकले नाहीत. मात्र, सर्व आधिकाऱ्यांनी योगासने केली.

दोन दिवसांच्या पुण्यातील मुक्कामानंतर रविवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना झाले. मात्र, या दोन दिवसांच्या काळात संयोजन समितीतील आधिकारी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर भारावून गेले होते. अखंड बैठक, प्रश्‍न समजून घेण्याची व त्यावर काय उपाययोजना करावी यावर आधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची हातोटी यामुळे आधिकारी थक्क झाल्याचा अनुभव या व्यवस्थेत असलेल्या आधिकाऱ्यांनी सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com