pm narendra modi appreciates creativity of vikas dige | Sarkarnama

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरच्या विकास डिगेला जगभरात पोहचवलं #StayAtHomeSaveLives

निवास चौगले
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना विरोधातील मोहिमेसाठी विकास डिगे याची डोकॅलिटी खुद्द मोदींनाही आवडली...

कोल्हापूर : कोल्हापूर या शहराला कलेचे माहेरघर म्हणतात. याची प्रचिती वारंवार येतच राहते. अश्याच एक कोल्हापूरच्या विकास डिगे  या हरहुन्नरी कलाकाराची कलाकृती देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला दाखवली.

जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर या निर्णयाला समर्थन देण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःच्या क्रियेटीव्हीटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी त्याने कोरोना विषाणूचे चित्र वापरून `कोई भी रोडपे ना आये`, असे सूचक आणि प्रभावी डिजाईन बनवले होते.

जनता कर्फ्यूच्या आदल्या दिवशी ता. 22 रोजी त्याने हे त्याच्या फेसबुक वरून शेअर केले होते. या इतक्या प्रभावी क्रियेटीव्हीटीच्या भुरळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पडली. त्यांनी रविवारी 25 मार्च रोजी देशाला पुन्हा संबोधित करताना विकास याची क्रिएटिव्हिटी संपूर्ण देशाला दाखवली. त्यात त्यांनी समाज माध्यमातून अश्या प्रकारे जागृती करणाऱ्यांचा विशेष उल्लेख करत त्यांचे आभार देखील मानले. विकास डिगे याची लक्ष्मीपुरी परिसरामध्ये ऍड टूमारो ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. 

`या छोट्याश्या क्रिएटिव्ह ची दखल खुद्द देशाचे पंतप्रधान घेतील अशे स्वप्नात देखील वाटले न्हवते. मात्र 21 तारखेला हे क्रिटिव्ह पोस्ट केल्या नंतर अनेकांनी हे क्रिटिव्ह शेअर केले तसेच स्वतः डीपी देखील लावले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे समाधान वाटले. मात्र खुद्द देशाच्या पंतप्रधानांच्या हाती माझे क्रिटिव्ह बघून सर्व स्वप्नवत वाटलं.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख