pm narendra modi | Sarkarnama

पंतप्रधानांच्या भेटीनेच कोट्यवधीचा आनंद- श्रद्धा मेंगशेट्टे

संभाजी देशमुख
शनिवार, 15 एप्रिल 2017

लातूर : बाबांकडे हट्ट धरला आणि बॅंकेच्या लोनवर हप्त्याने मोबाईल घेतला. बॅंकेचे पाच हप्ते भरल्यानंतर बुधवारी बॅंक अधिकाऱ्यांचा फोन आला आणि धडकीच भरली. हिम्मत करून फोन घेतला, तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी कुटुंबीयांसह नागपूरला जायचे आहे एवढा निरोप दिला. गुरुवारी पुन्हा बॅंक अधिकाऱ्यांनी फोन करून आई-बाबांना तुम्हाला एक कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याची बातमी दिली. बक्षिसापेक्षाही पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता येणार याचा आनंद मोठा होता.

लातूर : बाबांकडे हट्ट धरला आणि बॅंकेच्या लोनवर हप्त्याने मोबाईल घेतला. बॅंकेचे पाच हप्ते भरल्यानंतर बुधवारी बॅंक अधिकाऱ्यांचा फोन आला आणि धडकीच भरली. हिम्मत करून फोन घेतला, तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी कुटुंबीयांसह नागपूरला जायचे आहे एवढा निरोप दिला. गुरुवारी पुन्हा बॅंक अधिकाऱ्यांनी फोन करून आई-बाबांना तुम्हाला एक कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याची बातमी दिली. बक्षिसापेक्षाही पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटता येणार याचा आनंद मोठा होता. पंतप्रधान मोदी यांची प्रत्यक्षात भेट झाली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टे हिने दिली. 

केंद्र सरकारच्या डिजीधन लकी ग्राहक योजने अंतर्गत एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची मानकरी ठरलेल्या श्रद्धा मेंगशेट्टे हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात काल बक्षिसाचे वाटप करण्यात आले. लातुरातील मोहन व मीरा या दाम्पत्याची श्रद्धा ही मुलगी पुण्याच्या एआयएसएसपीएम महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकते. कॅशलेस इंडिया व डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने डिजीधन लकी ग्राहक योजना सुरू केली आणि 1590 रुपये मोबाईल हप्त्याचे पैसे डिजीटलद्वारे देणाऱ्या श्रद्धा यांना एक कोटीचे बक्षीस लागले. बक्षिसाचे मानकरी ठरल्याची माहिती जेव्हा बॅंक अधिकाऱ्यांनी दिली तेव्हा आम्हाला विश्‍वासच बसला नाही. पण ही बातमी खरी होती, एक कोटी रुपयांचे बक्षीस आणि पंतप्रधानांची भेट हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. पण ते सत्यात उतरल्याचा 
खूप आनंद होत असल्याचे श्रद्धाने सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख