PM in Nagpur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पंतप्रधानांनी कुलभूषण जाधव यांचा उल्लेख टाळला 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या महाराष्ट्र पुत्र कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात कोणताही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरातील भाषणात केला नाही. 

नागपूर : पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या महाराष्ट्र पुत्र कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात कोणताही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरातील भाषणात केला नाही. 

पंतप्रधान मोदी एक दिवसाच्या दौऱ्यावर नागपुरात आले होते. त्यांचे जवळपास तीन तास नागपुरात थांबले होते. या काळात त्यांचे भरगच्च कार्यक्रम होते. मानकापूर येथील क्रीडा संकुलात त्यांचे भाषण झाले. तेथे नीती आयोगाने डीजीधन मेळावा आयोजित केला होता. विविध योजनांचे उद्‌घाटनही त्यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी जवळपास 40 मिनिटे भाषण दिले. परंतु या दरम्यान त्यांनी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल काहीही उल्लेख केला नाही. कुलभूषण जाधव महाराष्ट्रातील असल्याने पंतप्रधान या संदर्भात काही वक्तव्य करतील, अशी अपेक्षा होती. परंतु पंतप्रधानांनी या संदर्भात काही न बोलणेच पसंत केले. 

जेटली व गंगवार अनुपस्थित 
नीती आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची अनुपस्थितीने अनेकांना धक्का बसला. जेटलींच्या मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या अनेक योजनांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. भीम-आधार ऍपचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज झाले. परंतु केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली किंवा केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोष गंगवार यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख