पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिंडोरी मतदारसंघात होणार सभा

ऐनवेळी विद्यमान खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांना टाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने चर्चेत असलेल्या दिंडोरी मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ची येत्या पंधरा दिवसांत जाहीर सभा घेण्यात येणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिंडोरी मतदारसंघात होणार सभा

निफाड : नाशिक, दिंडोरी मतदारसंघांची निवडणुक शेवटच्या टप्प्यात होत आहे. त्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यांपासून हेवीवेट नेत्यांच्या प्रचारसभांनी 'इलेक्‍शन फीव्हर' वाढणार आहे. ऐनवेळी विद्यमान खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांना टाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने चर्चेत असलेल्या दिंडोरी मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ची येत्या पंधरा दिवसांत जाहीर सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मतदारसंघाचे प्रचारप्रमुख आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हेवीवेट नेत्यांच्या प्रचारसभांमधून मतदारांना आकर्षित केले जाणार आहे. पिंपळगाव बसवंत येथे दिंडोरी, धुळे व नाशिक या तीन मतदारसंघांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पंतप्रधान मोदी यांची २००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंतच्या हायस्कूल मैदानावर सभा झाली होती. ती सभा खासदार चव्हाण यांच्या विजयासाठी टर्निग पॉइंट ठरली होती. त्या वेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान म्हणून ते प्रथमच पिंपळगावमध्ये जाहीर सभेच्या निमित्ताने येणार आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याही सभा होणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते शरद पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आदी नेते दिंडोरी मतदरासंघाचे मैदान गाजविण्यासाठी येत आहेत. माकप, वंचित आघाडीचे नेतेही प्रचारासाठी मैदानात येणार आहेत. दिंडोरी मतदारसंघात पारा ४० अंशांपर्यंत येऊन ठेपला आहे. रणरणत्या उन्हात सभा घेतल्या तर गर्दी होणार नाही, याची भीती उमेदवारांना आहे. बहुतांश सभा सायंकाळी होण्याची चिन्हे आहेत. प्रचारात धडाडणाऱ्या तोफांनी दिंडोरी मतदारसंघाचे वातावरण अधिक तापणार आहे. भाजपच्या डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीचे धनराज महाले, माकपचे जे. पी. गावित यांनी सोशल मीडियावरून प्रचाराचा धुरळा उडविला आहे. गावभेटी घेऊनही भूमिका पटवून देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर दिंडोरी मतदारसंघातून कोण विजयी होणार, याचीही उत्सुकता कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com