पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या पाच वर्षातले रिपोर्ट कार्ड हे केवळ रिपोर्ट कार्ड नसून ते राज्याच्या प्रगतीची कहाणी आणि पुढच्या प्रगतीशील वाटचालीचे भविष्य असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले.
PM Narendra Modi Praises Devendra Phadanavis in Nashik
PM Narendra Modi Praises Devendra Phadanavis in Nashik

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या पाच वर्षातले रिपोर्ट कार्ड हे केवळ रिपोर्ट कार्ड नसून ते राज्याच्या प्रगतीची कहाणी आणि पुढच्या प्रगतीशील वाटचालीचे भविष्य असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले. 

येथील तपोवन परिसरात ही सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, संघटन मंत्री धर्मेंद्र यादव, एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर रंजना भानसी, खासदार भारती पवार, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मोदींनी महाजनादेश यात्रेचेही कौतुक केले. ते म्हणाले, ''या देशात शतकानुशके यात्रांची परंपरा आहे. पण सगळेच यात्रेला जाऊ शकत नसले तरी जो यात्रा करुन परत येतो त्याला इतर नमस्कार करतात. कारण यात्रेचे अर्धे पुण्य त्यांना मिळते. मी इथे देवेंद्र यांनी केलेल्या यात्रेनंतर त्यांना नमन करायला आलो आहे. चार हजार किमी च्या यात्रेत कोटी कोटी लोकांनी आशिर्वाद देऊन त्यांच्यातले सामर्थ्य जागवले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशिर्वादाचा काही हिस्सा मी सुद्धा घेऊन घेऊन जाणार आहे,"

सभेत छत्रपती उदयनराजे यांनी मोदी यांचे शाही पगडी घालून स्वागत केले. मोदींनी ही पगडी डोक्यावर ठेऊनच आपले संपूर्ण भाषण केले. या पगडीचा उल्लेख करत ते म्हणाले, "आज एक विशेष धन्यता आहे. मी या क्षणाला बहुमुल्य क्षण मानतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजेंनी माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले. हा सन्मान पण आहे आणि जबाबदारीही आहे. नाशिकची पवित्र भूमी महाराष्ट्राचे कोटी नागरिक यांच्या इज्जतीसाठी मी माझे आयुष्य व्यतित करीन."

''एप्रीलमध्ये लोकसभा निवडणुका होत्या. त्यावेळी मी दिंडोरीत सभा घ्यायला आलो होतो. दिंडोरीच्या त्या सभेत प्रचंड गर्दी उसळली होती. तिथून आलेल्या सकारात्मक तरंगांमुळे देशातल्या भाजपचा पाठिंब्याल प्रचंड बळ दिले. एप्रीलच्या रेकाॅर्ड रॅलीचा विक्रम नाशिकने मोडला. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या चमूला महाआशिर्वाद द्यायला हा जनसागर आला आहे. हा लोकशाहीचा कुंभमेळा आहे.'' असेही मोदी म्हणाले.

''महाष्ट्रातल्या जनतेने ठरवले आहे जो अपेक्षा पूर्ण करु शकेल त्यालाच निवडून दयायचे. मी राज्यातल्या राजकीय पंडितांना आवाहन करतो की त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय उतार चढावयाबाबत त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती द्यावी. अस्थैर्यामुळे महाराष्ट्र ज्या सामर्थ्याने पुढे जायला हवा होता तो गेला नाही. या महाराष्ट्रात कोणी मुख्यमंत्री कुठले सरकार सलग पाच वर्षे राहण्याची केवळ दोन उदाहरणे घडली आहेत. एक वसंतराव आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. जर सरकारे स्थिर राहिली असती तर चित्र वेगळे असते." असे सांगत देवेंद्र फडणवीस पुन्हा निवडून येतील असा ठाम विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

''पाच वर्षे सरकार चालवून देवेंद्र यांनी एक दिशा दिली आहे. आता महाराष्ट्राचे कर्तव्य आहे की त्यांनी देवेंद्र यांच्या पाठीशी उभे राहून स्थिर शासनाची फळे चाखावीत. १९६० मध्ये गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्ये बनली. गुजरात मध्ये सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला तिथल्या जनतेनी दिली. जनतेशी उत्तरदायित्व ठेवण्याचा फायदा नक्की मिळतो. तो मला मिळाला, देवेंद्र फडणवीस यांनीही मिळाला. ६० वर्षांनंतर पहिल्या वेळी एक सरकार दुसऱ्यांदा आणि जास्त ताकदीने आले हे साठ वर्षानंतर देशात प्रथमच घडले. ही आपली ताकद आहे.'' असेही मोदी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com