कॉंग्रेस-जेडीएस आता कर्नाटकाच्या लोकांचा विश्वासघात करू शकणार नाही - मोदी

कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) कर्नाटकातील लोकांचा आता विश्वासघात करू शकणार नाहीत, हे आजच्या निकालाने स्पष्ट केले आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील हाजारीबाग येथे बोलताना दिली आहे.
कॉंग्रेस-जेडीएस आता कर्नाटकाच्या लोकांचा विश्वासघात करू शकणार नाही - मोदी

पुणे - कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) कर्नाटकातील लोकांचा आता विश्वासघात करू शकणार नाहीत, हे आजच्या निकालाने स्पष्ट केले आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील हाजारीबाग येथे बोलताना दिली आहे. 

कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत 12 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकातील भाजपच्या येडियुरप्पा सरकारला अल्पमताचा धोका उरलेला नाही. 

या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हाजारीबागमध्ये बोलत होते. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. त्यात मोदींनी म्हटले आहे, की कर्नाटकातील जनतेने स्थिर आणि मजबूत सरकारच्या मागे ताकद उभी केली आहे. त्यामुळे तेथे आता `जोड-तोड' असणारे सरकार नाही, तर एक मजबूत स्थिर सरकार असेल.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com