pm modi congratulates Congress, KCR and MNF for victory | Sarkarnama

पंतप्रधान मोदींकडून कॉंग्रेस, केसीआर आणि एमएनएफचे अभिनंदन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस, के. चंद्रशेखर राव (केसीआर) आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) चे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस, के. चंद्रशेखर राव (केसीआर) आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) चे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. 

लोकांनी दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे ट्विट करीत मोदींनी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या जनतेचे आभार मानले आहेत. या राज्यांतील भाजप सरकारे लोकांच्या भल्यासाठी अविश्रांत झटल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानताना, या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतल्याचा उल्लेख केला आहे. जय-पराजय हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या निकालामुळे भारताच्या विकासासाठी आपण अजून कामाला सुरवात करूया, असेही त्यांनी म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख