मावळातील विजयाबद्दल श्रीरंग बारणे यांचे मोदींकडून कौतुक

मावळातील विजयाबद्दल श्रीरंग बारणे यांचे मोदींकडून कौतुक

पिंपरी : पवार परिवाराचा पहिला राजकिय पराभव केल्याबद्दल मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पंतप्रधान कार्यालयात बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पु्ष्पुगुच्छ देऊन गुरुवारी खास अभिनंदन व कौतुक केले. चांगली संधी मिळाली असून चांगले काम करा,असे पंतप्रधान म्हणाल्याचे या भेटीनंतर बारणे यांनी दिल्लीहून `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. राज्यात काय चाललंय,अशी विचारणाही मोदींनी यावेळी केली.

नुकत्याच झालेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत मावळच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अनेक राजकीय विश्लेषक व माध्यमांचे प्रतिनिधी वेगवेगळा अंदाज बांधत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मावळ लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून होते. अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवत असल्यासारखे मावळ मतदारसंघात प्रचार करीत होते. संपूर्ण पवार कुटुंबीय प्रचारात सक्रिय होते. शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात तीन सभा घेतल्या. या परिवाराने कधी नव्हती एवढी ताकज सर्व बाजूंनी लावली.

पुणे, बारामती तसेच राज्याच्या अनेक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.असे सर्व असतानाही बारणे यांनी जवळपास सव्वा दोन लाख मतांनी आपले प्रतिस्पर्धी व अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांचा पराभव केला.पवार परिवारातील पहिला पराभव मोठ्या मताधिक्याने केल्याबद्दल मोदींनी बारणेंना त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांचे अभिनंदन केले. मोदींनी लोकसभेच्या वर्धा येथील राज्यातील पहिल्या जाहीर प्रचार सभेत मावळचा उल्लेख केला. पवार परिवाराचा पराभव करण्याचे आवाहन देखील या सभेत त्यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com