pm modi on ayodhya verdict | Sarkarnama

`रामभक्ती असो, की रहीमभक्ती; ही वेळ भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याची' 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

रामभक्ती असो, की रहीमभक्ती; ही वेळ भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याची आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या प्रकरणी सर्वोच्चा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर दिली आहे.

पुणे - रामभक्ती असो, की रहीमभक्ती; ही वेळ भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याची आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या प्रकरणी सर्वोच्चा न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर दिली आहे.

मोदी यांनी ट्विट करीत म्हटले आहे, की सर्वोच्चा न्यायालयाने अयोध्य प्रकरणावर आपला निकाल दिला आहे. या निकालाला कोणी जय-पराजय या दृष्टीने पाहू नये. रामभक्ती असो, की रहीमभक्ती; ही वेळ भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याची आहे.

देशवासियांनी शांतता, सद्भाव आणि एकता ठेवावी, असेही मोदी यांनी आवाहन केले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख